Breaking
महाराष्ट्रराजकिय

तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या संकल्पनेतून आयोजित मोफत शिबिरास प्रतिसाद

आमदार मोनिकाताई राजळे यांची प्रमुख उपस्थिती.

0 6 0 5 0 9

तहसीलदार प्रशांत सांगडेयांच्या
संकल्पनेतून आयोजित मोफत शिबिरास प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी – असिफ सय्यद

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेतील आव्हाने बु., दिंडेवाडी, भगुर व परिसरातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी कर्तव्य दक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्पनेतून आयोजित मोफत शिबिरास उपस्थित राहून या शिबिराचे उद्घाटन केले.

या भागातील शेकडो महिलांची नोंदणी व योजनेसंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी शेवगाव पाथर्डी च्या *कर्तव्यनिष्ठ आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे* यांनी उपस्थित महिला-भगिनींशी संवाद साधत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या योजनेंतर्गत प्रत्येक घरातील महिलांना प्रती महिना 1500/- रू. अनुदान देण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या या नारी सशक्तीकरणाच्या अभूतपूर्व मोहिमेत सहभागी होऊन महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे