Breaking
ई-पेपर

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार.

*मुख्यमंत्री येणार..

0 6 0 5 1 9

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे
राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार..
*मुख्यमंत्री येणार :
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष..

मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यात उदगीर येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी आज येथे केली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील..
पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारया आणि 87 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचं दर दोन वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय अधिवेशन होते.. यापुर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव, नांदेड येथे परिषदेची अधिवेशनं झाली.. यावेळेस उदगीर येथे अधिवेशन होत असून अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे..
परिषदेच्या एका शिष्टमंडळाने अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.. मुख्यमंत्र्यांनी परिषदेची विनंती मान्य केली असून “मी नक्की येतो” असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.. मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, परिषदेचे लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, संयोजन समितीचे युवराज धोतरे आदि होते..
यंदाचं अधिवेशन हटके होणार आहे.. देशभरातील मान्यवर पत्रकारांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे..
यंदाच्या अधिवेशनास देशभरातून 3000 पत्रकार येतील असा अंदाज असून त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे.. अधिवेशनाच्या उदगीर येथील कार्यालयाचे उद्घाटन देखील नुकतेच एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .. मराठी पत्रकारांच्या दृष्टीने गौरवाचा सोहळा असलेल्या परिषदेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, संयोजन समितीचे श्री. युवराज धोतरे आदिंनी केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे