Breaking
ई-पेपर

जिल्हा परिषद प्राथमिक कुकाणा शाळेतील दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत समावेश..

0 4 6 0 5 8

जिल्हा परिषद प्राथमिक कुकाणा शाळेतील दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत समावेश..

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दहा विद्यार्थ्यांचा मिशन आरंभ अंतर्गत नवोदय पूर्व शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाला असून एप्रिल २०२५ चा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला,
या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या ११३ विद्यार्थ्यापैकी कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून शाळेचा निकाल ९१.८९% लागला आहे.कुकाणा शाळेतील,श्रेया गुगळे, शर्य माणकेश्वर या दोघींचा जिल्ह्यात १६ वा क्रमांक आला तर रोनक शैख जिल्ह्यात १८व क्रमांक त्याच बरोबर हिंदवी कचरे,प्रणिती राजगुरू या दोघांचा जिल्ह्यात १९ व क्रमांक आला,सबा सय्यद , श्रेया राउत या दोघींचा २० वा क्रमांक आला आहे माहेश्वरी कचरे, श्रेयस सदावर्ते या दोघांचा २१ वा क्रमांक आला आहे, ईश्वरी आवारे २२ वा क्रमांक आला आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा
वर्ग शिक्षका शारदा टेकाडे , ज्योती चांदणे ,मुख्यधिपीका विजया साठे, ताराचंद कोकाटे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे, यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड , विस्तार अधिकारी शैख , केंद्रप्रमुख लाटे तसेच
शाळा व्यवस्थापन सामितिचे अध्यक्ष देविदास गरड व उपाध्याक्ष महेश सदावर्ते व सर्व व्यवस्थापन कमिटीचे सदस्य मंडळाने तसेच
सरपंच लता अभंग व उपसरपंच शुभांगी कचरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे