एकल महिला रोजगार मार्गदर्शन नेवाशात उत्साहात संपन्न..

एकल महिला रोजगार मार्गदर्शन नेवाशात उत्साहात संपन्न
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
एकल महिलांना विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी पंचायत समिती सभागृहात रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय बिरादार होते. याप्रसंगी नेवासा तालुक्यातील बचत गटाच्या 250 हून अधिक एकल महिला रोजगार मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाल्या होत्या .
उमेद अभियान, महिला व बाल विकास प्रकल्प व साऊ एकल महिला नेवासा तालुका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरास गटविकास अधिकारी संजय लखवाल , नायब तहसीलदार संदीप चिंतामणी ,नगराध्यक्ष डॉ.करणशिंह घुले, साऊ एकल महिला समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड , अप्पासाहेब वाबळे , रेणुका चौधरी , सेंट्रल बँक समन्वयक रविंद्र काळे , जिल्हा संसाधन कृषी अधिकारी सीमा काळकुंड , बाल विकास प्रकल्पाधिकरी भावना पवार ,रेणुका कुऱ्हे , उमेद अभियान तालुका व्यवस्थापक अर्जुन सोनवणे , ऐश्वर्या देशमुख ,विलास राठोड आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी गट विकास अधिकारी संजय लखवाल ,तहसीलदार संजय बिरादार ,रविंद्र काळे ,सिमा काळपुंड , मिलिंद साळवे, कारभारी गरड , अर्जुन सोनवणे आदींनी आपल्या मनोगतातून एकल महिला बचत गटासाठी व वैयक्तिक शासनाच्या विविध योजना , करावयाचे उद्योग – व्यवसाय त्यासाठी आवश्यक कागदपत्र, सादर करावयाचा प्रस्ताव , कर्ज मर्यादा ,अनुदान ,बँकेची मंजुरी , परतफेड, तयार केलेले साहित्य वस्तू यांची विक्री व्यवस्थापन याबाबत सविस्तर विवेचन केले.
एकल महिलांच्या संजय गांधी योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, सामाजिक अर्थसाह्य योजना,तसेच त्यांच्या बालकांसाठी असणारी बाल संगोपन योजना , शैक्षणिक सुविधा , इतर योजना, साऊ एकल महिला समितीचे कार्य व शासनाच्या विविध विभागाची जबाबदारी आदींबाबत माहिती दिली.
सूत्रसंचालक बाळासाहेब पिसाळ यांनी केले, शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब कासार , जयश्री जाधव,नितीन पंडित, तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, बचत गटाच्या सीआरपी व अंगणवाडी ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.




