Breaking
ई-पेपर

*राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी*

*अवघ्या पाच मिनिटांत गणिती क्रिया सोडवत विद्यार्थ्यांनी मिळवले विविध क्रमांक व उत्कृष्ट पुरस्कार*

0 9 5 0 2 3

*राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी*

*अवघ्या पाच मिनिटांत गणिती क्रिया सोडवत विद्यार्थ्यांनी मिळवले विविध क्रमांक
व उत्कृष्ट पुरस्कार*

नेवासा प्रतिनिधी :

नेवासा येथे एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली. सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत गोगलगाव व दिघी शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विविध क्रमांकांसह उत्कृष्ट पुरस्कार पटकावले.


अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या पाच मिनिटांत विविध गणिती क्रिया अचूकपणे पूर्ण कराव्या लागतात. या आव्हानात्मक स्पर्धेत वेदिका दत्तात्रय गायकवाड (८९), देवांश कपिले (९३), आराध्या सुरज करडक (१०३) यांनी प्रथम क्रमांक, तर चैतन्य राजेंद्र कुऱ्हाडे (८८) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. अनन्या अमोल मते (९१) यांनी चौथा क्रमांक, तर शिवराज संतोष गव्हाणे (१५२) यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
तसेच वेदांत अभिजीत कुऱ्हाडे (९९) यांनी सहावा क्रमांक, कृष्णा अरुण मोरे व प्रद्युम्न अशोक नागोडे (८८) यांनी सातवा क्रमांक, तर आराध्या अनिल साळुंखे (९९) यांनी आठवा क्रमांक मिळवला. प्रणिती संभाजी मते (८१) व स्वराली बापूसाहेब साळुंखे (८७) यांनी दहावा क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.
याशिवाय शितल आदिनाथ निकम (९९), सर्वेश गणेश नागोडे (१०५), श्रुती अनिल साळुंखे (८८), शिवनेरी वैजनाथ निकम (१३५) यांच्यासह प्रथमेश मते, वेदश्री मते, शिवराज भगत, आरोही निंबाळकर, काव्या नागोडे, स्वरा नागोडे, रुद्र गोसावी, ऐश्वर्या औटी, तन्मय मस्के, आयुष परदेशी, सिद्धिका पठाण, चैतन्य कुमावत, सुदर्शन नागोडे, स्वानंदी साळुंखे, सत्यम ताकवणे, आयुष शिंदे, साई शिंदे, दूर्वा नागोडे, अनिकेत पवार व ऋषी गोरे यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत विविध पुरस्कार मिळवले. विवेक भालेराव यांनीही उत्कृष्ट पुरस्कार पटकावला. विद्यार्थ्यांना Best Prize व Consolation Prize सारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. उमा राजेंद्र कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला, मेहनतीला आणि मार्गदर्शनाला मिळालेल्या या यशाबद्दल पालक तसेच ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करणसिंह घुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य तेजश्री लंघे, सौ. अमृता नलकांडे, विशाल एरंडे, स्त्रीरोग तज्ज्ञ देशमुख मॅडम, नगरसेवक अंकुश मस्के, सोनई पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, गोविंद व्यवहारे यांच्या संचालिका डॉ. कल्पना घडेकर व अशोक घडेकर आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेले हे यश त्यांच्या गणिती कौशल्यासोबतच आत्मविश्वास, एकाग्रता आणि मेहनतीचे द्योतक असून, या यशामुळे नेवासा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे