Breaking
ई-पेपर

विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात बैलपोळा उत्साहात साजरा.

0 4 6 2 8 7

विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात बैलपोळा उत्साहात साजरा.

कुकाणा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

आपल्या संस्कृती, सण यांचा वारसा, महत्त्व आजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या दृष्टीकोनातून कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात बैल पोळासण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैल पोळा या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करतात . आधुनिक युगात शेती ही तांत्रिक उपकारणाच्या सहाय्याने केली जाऊ लागल्याने शेतकऱ्याकडे बैलांचे प्रमाण कमी झाले असून ही चिंतेची बाब आहे. त्या मुळे
विद्यालयात शिक्षक व विद्यालयाच्या प्रमुख कीर्ती बंग यांच्या कल्पकतेतून बैलपोळा हा सण साजरा केला असल्याचे शिक्षिका अनिता बडे यांनी सांगितले.
कुकाणा येथील शेतकरी वसंत पवार यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बैलांना सजवले. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पूजा केली. बैलांचे महत्त्व सांगून बैलपोळा साजरा करण्याचा उद्देश यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. या प्रसंगी शिक्षिका अनिता बडे प्रतिभा कदम,सोनाली जामदार, पूजा पवार रोहिणी सरोदे आदी शिक्षिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे