Breaking
ई-पेपर

आरोग्यासाठी योग्य आहार व व्यायाम गरजेचा – डॉ अंजली गाडगे .

जिजामाता महाविद्यालयात 'निर्भर कन्या अभियान 'निमित्त व्याख्यान.

0 6 0 5 3 1

आरोग्यासाठी योग्य आहार व व्यायाम गरजेचा – डॉ अंजली गाडगे .

जिजामाता महाविद्यालयात ‘निर्भर कन्या अभियान ‘निमित्त व्याख्यान.

नेवासा – ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

स्त्रियांच्याआरोग्यासाठी योग्य आहार व व्यायाम गरजेचा आहे. विद्यार्थिनींनी शारीरिक,मानसिक व बौद्धिकदृष्ट्या निर्भय होणे गरजेचे आहे. सततच्या मोबाईल वापरामुळे हार्मोन्स बदल होऊन त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम होतात असे प्रतिपादन डॉ अंजली गाडगे यांनी केले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व जिजामाता शास्र व कला महाविद्यालय भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयात दोन दिवशीय ‘निर्भय कन्या अभियान ‘कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
‘स्त्रियांचे आरोग्य ‘याविषयावर डॉ अंजली गाडगे यांचे व्याख्यान झाले तर प्रा संतोष सोनवणे यांचे ‘स्त्रियांच्या सामाजिक समस्या ‘या विषयावर व्याख्यान झाले.प्रसंगी .शिक्षणसंस्थेचे विश्वस्त प्रा डॉ.नारायण म्हस्के अध्यक्षस्थानी होते .
प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ रमेश नवल, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, डॉ. काकासाहेब लांडे, डॉ. संजय दरवडे, डॉ. अनुराधा बोठे, डॉ.मोहिनी साठे, प्रा.पल्लवी मोटे यांचेसह विद्यार्थी -विद्यार्थींनी मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.किरण खरड यांनी तर प्रा.मीना पोकळे यांनी आभार मानले.

 

………………………….. #….. …………………………. …

उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे – प्रा संतोष सोनवणे .

हुंडाबंदी,स्त्री-भ्रूण हत्या,कौटुंबिक हिंसाचार या विषयावर विद्यार्थिनींनी समाजात जागृती करावी.तसेच आई -वडील व गुरुजनांच्या कष्टाची जाणीव ठेवत प्रामाणिक कष्ट करत विद्यार्थिनींनी उच्चशिक्षण घेत स्वावलंबी व्हावे असे विचार व्यक्त

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे