जनतेच्या प्रेमापेक्षा मोठी माझी आमदारकी की नाही :-आमदार विठ्ठलराव लंघे.

एवढी मोठी गोरगरीब जनता प्रेम करणारी माझ्यावर आहे की या जनतेच्या प्रेमापेक्षा मोठी माझी आमदारकी की नाही :-आमदार विठ्ठलराव लंघे
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील आ.विठ्ठलराव लंघे यांचे समर्थक अश्फाक शेख हे आज सकाळी आ. विठ्ठलराव लंघे आमदार व्हावेत म्हणून त्यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला नवस केला होता की आ.विठ्ठलराव लंघे हे आमदार झाल्यानंतर मी सलाबतपुर ते तुळजापूर पाई पाई दर्शनासाठी येईल व चांदीचा घोडा अर्पण करेल.
त्याच पार्श्वभूमीवरती अश्फाक शेख या अल्पसंख्यांक कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे हे सलाबतपुर येथे आले आले होते .
यावेळी आ.विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की एवढी मोठी जनता माझ्यावर प्रेम करणारी आहे की जनतेच्या प्रेमापेक्षा माझी आमदारकी मोठी नाही मी सर्वसामान्य जनतेमधील एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणूनच राहील तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याची काम व अडल्यां नडल्यांचे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम मी आमदारकीच्या माध्यमातून करणार आहे .
अनेक वर्ष वडील कॉम्रेड आ. वकीलराव लंघे पाटील हे कम्युनिस्ट पक्षांकडून आमदार होते सलाबतपुर परिसराने मोठ्या प्रमाणात अन्नावर प्रेम केले आहे अशपाक भाई सारखे असंख्य कार्यकर्ते नेवासा तालुक्यामध्ये लंघे परिवारावर प्रेम करणारे आहेत.
अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या आमदारकी साठी नवस केले आहेत कोणी मला देवाला नेण्याचा नवस केला तर कोणी पेढे तुला करण्याचा नवस केला तर कोणी मी आमदार होऊपर्यंत चप्पल न घालण्याचा नवस केला.
नेवासा तालुका ही संताच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या सोबत आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्यांनी ही नेवासा भूमी पवित्र झाली आहे त्यांचाही शुभ आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे देवगड सारखे सुंदर देवस्थान आपल्याला तालुक्याला लाभले आहे त्याच पद्धतीने अनेक थोर संत महंत आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्यांचाही आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच आहे.
आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व विशेष म्हणजे आपल्याला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही खंबीर साथ आपल्याला विकास कामासाठी नेहमीच आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आखलेला 700 ते 800 कोटी रुपयांचा संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा पुढे न्यायचा आहे त्या माध्यमातून आपल्या तालुक्याला दळणवळण वाढणार आहे तसेच अनेक विकास कामे त्या माध्यमातून होणार आहेत अशा ऐतिहासिक स्थळाचा आमदार म्हणून मी विधानसभेत गेलो याचा मला मोठा अभिमान आहे. मी स्वतःलाच फक्त आमदार मानत नाही या आमदार पदाची मानकरी ही नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनता आहे.
काही ज्ञात काही अज्ञात पद्धतीने माझ्या विजयामध्ये सामील आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानतो व आपण हा दहशतीचा बुरखा या ठिकाणी फाडलेला आहे अशी टीका आ.लंघे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या वर केली.
येत्या काळामध्ये पीण्याचे पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचे काम आमदारकीच्या माध्यमातून मी करणार आहे पहिले मी तुमच्या मधला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यानंतर मी आमदार आहे मी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या हातून चांगली जनसेवा घडो व आमचे कार्यकर्ते अशपाक भाई शेख हे आज प्रवासाला निघालेले आहे त्यांचा प्रवास सुख करून हो व आई तुळजाभवानी त्यांना शुभ आशीर्वाद देवो ही सदिच्छा आमदार लंघे यांनी व्यक्त केली व अशपाक भाई शेख यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी आ.लंघे यांनी उपस्थित सलाबतपुर येथील जनतेचे आभार व्यक्त केले.