पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा कुकाणा येथील मुस्लिम बांधवांकडून निषेध

पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा कुकाणा येथील मुस्लिम बांधवांकडून निषेध
नेवासा – अहिल्यानगर
अ.नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे शुक्रवारच्या नमाजनंतर अहले-सुन्नत-वल-जमातच्या जामा मशिदीमध्ये पहलगामला मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता,त्या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी मौलाना शमशाद पठाण यांनी म्हटले की इस्लाम धर्मात निष्पाप नागरिकांची हत्या आणि हिंसा करणे या गोष्टीला थारा नाही, शांततामय मार्गानेच आपण आपला व पर्यायाने देशाचा विकास होणार आहे व तेच काही असामाजिक तत्वांना नको आहे म्हणून असे भ्याड हल्ले करुन देशातील शांतता बिघडण्याच काम केलं जात आहे सर्वांनी संयमाने आणि शांततेनं अशा या सैतानी कृत्याचा जाहीर निषेध करावा.यावेळी जामे मस्जिद कुकाणाचे अध्यक्ष प्रा.रज्जाकशहा इनामदार यांनी श्रद्धांजली वाहतांना आतंकवाद्यांना जातपात नसते, सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहसचिव प्रा.शकुर शेख यांनी मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, आधी आपला भारत देश महत्वाचे असून, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबाच्या दु:खात देशभरातील सर्व मुस्लिम बांधव सहभागी असल्याचे सांगितले. तसेच पर्यटकांवर भ्याड हल्ला करणार्या आतंकवाद्यांना प्रशासन सडेतोड उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी काळ्या फिती लावून दोन मिनिटे शांत उभे राहून पहलगाम येथील हल्ल्यातील मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी रशिद शेख, इमरान शेख,सलमान नालबंद,आरिफ तांबोळी, निसार सय्यद,अकील तांबोळी, चांद शेख, ॲड.सद्दाम शेख, फैयाज तांबोळी,अल्ताफ तांबोळी,वसिम तांबोळी,आरेज तांबोळी,शाकीर नालबंद,तैय्यब शेख,तोफिक शेख,प्रा. इस्माईल शेख आदि युवक उपस्थित होते.