Breaking
ई-पेपर

साऊ एकल महिला समितीच्या वतीने होळी निमित्त विधवा प्रथेचे दहन

0 4 6 3 2 6

साऊ एकल महिला समितीच्या वतीने होळी निमित्त विधवा प्रथेचे दहन

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

समाजाच्या पारंपरिक रूढी परंपरा विधवा महिलांवर कायम अन्याय करत आलेल्या आहेत त्यामुळे या प्रथेच होळीच्या सणाच्या निमित्ताने दहन करून विधवांना यातुन मुक्तता करण्यासाठी यावेळी शपथ घेतल्याचे साऊ एकल महिला समितीच्या उपाध्यक्ष रेणुका चौधरी यांनी सांगितले

विधवा महिलांना रूढी-परंपरांच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी समाजाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विधवा म्हणजे केवळ दु:खाची मूर्ती नाही, तर तीही एक स्वतंत्र, सक्षम आणि आपल्या हक्कांनी जगणारी व्यक्ती आहे. तिच्या आयुष्यावर बंधने घालण्याऐवजी तिला शिक्षण, पुनर्विवाह, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाची संधी द्यायला हवी.

समाजातील जुने, अन्यायकारक संकेत मोडण्याची जबाबदारी आपली आहे. विधवा महिलांवर असलेले अंधश्रद्धेचे ओझे दूर करून त्यांना सन्मानाने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार द्यायला हवा.

पतीच्या निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो परंतु तिचे कुंकू पुसणे, जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही. तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते, परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते.  तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं. विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची, कुटुंब खर्चाची, वृद्ध सासू-सासर्‍यांच्या औषध उपचारांच्या खर्चाची जबाबदारी येते. अशावेळी तिला विधवा म्हणून समाज तिच्याकडे अबला कुंमकुवत नजरेने बघतो. काही विधवांचे अतिशय लहान मूल असतात. त्यांना बापाच्या सावलीची व तिला पतीची गरज असते. अशावेळी तिला जर पती गेल्यानंतर पुनर्विवाहस परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते. विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू- टिकली, सौंदर्य प्रसादानाची दाग-दागिने, मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाहसाठी परवानगी पाहिजे

विधवांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी साऊ एकल महिला नेवासा तालुक्यातील महिलाच्यासाठी काम करत आहे यावेळी लक्ष्मण आरगडे, क्रांती भालेराव, संगीता नवले, उज्ज्वला सोनपुरे, सोनाली भालेराव,स्वाती फाळके, मुक्ता निकम ,आदी महिला उपस्थित होत्या

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे