Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा त्रिमूर्ती विद्यालयात जंगी सत्कार*

0 9 5 0 2 3

*शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा त्रिमूर्ती विद्यालयात जंगी सत्कार*

नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालय व श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिष्यवृत्ती सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. स्नेहल चव्हाणपाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा संगम केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील तसेच मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण पाटील निपुंगे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य सोपान काळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यासाची जोपासना करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर विभागप्रमुख नामदेव ताके, मिलिंद सोनवणे, अंजली होन, निवासी प्राचार्य एकनाथ कापसे तसेच पालक प्रतिनिधी रामदास बानकर आणि जेजुरकर उपस्थित होते.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रायटिंग बोर्ड, पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना घडविणारे मार्गदर्शक शिक्षक अर्जुन भांड, सुचिता जाधव, प्रियांजली कराड, दत्तू गर्जे आणि लहू गिरी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे रवींद्र कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “केवळ गुण मिळविणेच नव्हे तर चांगले संस्कार, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावरच आयुष्यात मोठे यश प्राप्त करता येते,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण दळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विभागप्रमुख नामदेव ताके यांनी केले. हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव होताच उपस्थित पालकांनीही आनंद व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे