*नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सौंदाळा शाळेत सत्कार..
*नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सौंदाळा शाळेत सत्कार..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा अहिल्यानगर
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या सौंदाळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा व शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सौंदाळा यांच्याकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सालाबाद प्रमाणे सौंदाळा शाळा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरवर्षीच शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत अग्रेसर असते. यामध्ये यावर्षी नेवासा तालुक्यातून आठ विद्यार्थीची नवोदय साठी निवड झाली व विशेष म्हणजे ती आठही विद्यार्थी सौंदाळा शाळेतीलच आहेत. या आठ विद्यार्थ्यांमध्ये गौरव कोठुळे गौरव बर्वे राजवर्धन नवथर समर्थ ढेरे आर्यवीर निंबाळकर क्षितिजा एडके तनुष्का कोठुळे व स्वरा बोर्डे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्याकडून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून कामकाज करणारे श्री रवींद्र पागिरे सर व श्री कल्याण मेहुल सर या दोन्ही शिक्षकांचा त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपटराव घुले सर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा भारत आरगडे, सर्व सदस्य त्याचप्रमाणे सौंदाळा गावचे सरपंच श्री शरदराव आरगडे ग्रामपंचायत सदस्य भिवसेन गरड,उपसरपंच गणेश आरगडे, बबन आरगडे, सचिन आरगडे, राजेंद्र आरगडे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक घुले सर यांनी 2019 पासून शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख सर्वांसमोर सादर केला.




