*आदर्श विद्या मंदिर, सोनई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

*आदर्श विद्या मंदिर, सोनई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*
सोनई (दि. २४) : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील आदर्श विद्या मंदिर, सोनई येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते, राष्ट्रभक्त आणि समाजजागृतीचे अग्रदूत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षणावरील निष्ठा, सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या प्रेरणादायी घोषणेचा आजच्या पिढीने आदर्श ठेवून देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याविषयी माहिती जाणून घेत त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




