Breaking
ई-पेपर

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्षपदी अँड.सोनल वाखुरे.

नेवासा तालुका कार्यकारिणी ही जाहीर..

0 6 0 5 1 9

 

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्षपदी अँड सोनल वाखुरे यांची निवड व कार्यकारिणी ही जाहीर…

नेवासा – (अहिल्यानगर )

सविस्तर वृत्त असे की, महिला दिनानिमित्त पावन गणपती मंदिर नेवासा फाटा रोड येथे जिजाऊ ब्रिगेड चे वतीने उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची तसेच अँड स्मिता लवांडे व अँड मयूर वाखुरे यांचे कायदेविषयक मार्गदर्शन व बालकांचे व्याख्यानं सह विविध उपक्रम राबवून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या कै अँड के एच वाखुरे यांची सून अँड सोनल मयूर वाखुरे यांचा सत्कार करून जिजाऊ ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष नंदिनी सोनाळे व उपाध्यक्ष शारदा वांढेकर यांचे सूचनेनुसार कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष अँड स्मिता लवांडे, सचिव अँड रेणुका कोकाटे, कार्याध्यक्ष उज्वला मते, सहसचिव अँड रुपाली मते, कोषाध्यक्ष प्रियंका वाखुरे, संघटक कल्पना वरुडे, सहसंघटक अनिता मते, प्रसिध्दी प्रमुख छाया जगताप, सदस्य पदी कल्याणी कुटे, उज्वला शिंदे, रुपाली मते, वर्षा काळे, शुभांगी मुंगसे,कविता फाटके,ज्योती घाडगे तसेच
तालुका मार्गदर्शक म्हणून अँड सुरेखा टेमक, कल्पना मते यांची निवड करण्यात आली. निवडपदाचे पत्रक रावसाहेब घुमरे यांचे हस्ते देण्यात आले. सर्व जिजाऊ ब्रिगेड चे सदस्यांसह पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे