Breaking
ई-पेपरराजकिय

*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे; वरिष्ठांचा आदेश अंतिम — आमदार विठ्ठलराव लंघे*

0 9 5 0 2 3

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे; वरिष्ठांचा आदेश अंतिम — आमदार विठ्ठलराव लंघे

अहिल्यानगर :

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाला, तर निवडणूक प्रक्रिया अधिक सोयीस्करपणे पार पडू शकते. मात्र, याबाबत पुढील वाटचाल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्णय व आदेशानुसारच राहील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार लंघे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. संगमनेर येथे झालेल्या बैठकीला आमदार म्हणून मला तसेच माझ्या सहकाऱ्यांना कोणताही निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे आपण त्या बैठकीला गेलो नाही, असे लंघे यांनी सांगितले. त्यामुळे बैठकीच्या निमंत्रणावरून लंघे यांची नाराजी असल्याची चर्चा सुरू असली, तरी या नाराजीपेक्षा वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाला डावलून किंवा कोणाला वेगळे ठेवून निर्णय घेण्यापेक्षा सर्व संबंधितांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. सर्वांचा विचार करून निवडणुकीबाबत निर्णय घेतला तर तो अधिक सोयीस्कर आणि सर्वमान्य पद्धतीने पुढे नेता येईल, असे लंघे यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून या परिस्थितीवरही पत्रकारांशी संवादादरम्यान चर्चा झाली. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडेही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाहण्याची गरज असल्याचे लंघे यांनी सूचित केले.

संगमनेरच्या बैठकीला निरोप न मिळाल्याने लंघे नाराज आहेत का, या चर्चेला उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “नाराजी असली तरी वरिष्ठ नेत्यांचा आदेश अंतिम राहील,” असे सांगत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा निर्णय आणि आदेशच पुढील दिशादर्शक ठरणार असल्याचे आमदार लंघे यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांना विश्वासात घेण्याच्या लंघे यांच्या भूमिकेमुळे पुढील राजकीय हालचालींकडे आता सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे