किड्स किंगडम विद्यालय तालुक्यातील गुणवत्तेत अग्रेसर- जेष्ठ पत्रकार सुनील पंडित
किड्स किंगडम विद्यालयात पत्रकारांचा सन्मान.

किड्स किंगडम विद्यालय तालुक्यातील गुणवत्तेत अग्रेसर- जेष्ठ पत्रकार सुनील पंडित.
किड्स किंगडम विद्यालयात पत्रकारांचा सन्मान
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
किड्स किंगडम विद्यालय तालुक्यातील गुणवत्तेत अग्रेसर असून विद्यार्थ्यांना
घडवण्यासाठी अथक परिश्रम घेणार विद्यालय म्हणून ओळखले जात असल्याचे जेष्ठ पत्रकार सुनील पंडित यांनी म्हणले ते किड्स किंगडम अकॅडमी कुकाणा येथे पत्रकार दीना निमित्ताने पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. प्रसंगी विचार मंच्यावर पत्रकार नामदेव शिंदे सोमनाथ कचरे विद्यालयाच्या प्रमुख किर्ती बंग उपस्थित होत्या.
या वेळी उपस्थित पत्रकारांचा विद्यालयाच्या वतीने किर्ती बंग यांनी सन्मान केला. पत्रकरांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी पत्रकार सोमनाथ कचरे नामदेव शिंदे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाचे आभार व्यक्त केले,
कार्यक्रमासाठी शिक्षिका अनिता बडे प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम आदी सह विद्यार्थी उपस्थित होते.