Breaking
ई-पेपर

*प्राचार्य सोपानराव काळे यांना राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने गौरव*

0 9 5 0 2 3

प्राचार्य सोपानराव काळे यांना राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने गौरव

नेवासा फाटा, दि. १८ : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

कबड्डी क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदान देत हजारो खेळाडूंना घडविणारे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे यांना महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त तसेच २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्याचे उद्योग विकास मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्राचार्य काळे यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य सोपानराव काळे यांनी १९९५ साली तेलकुडगाव येथे कबड्डी संघाची स्थापना करून ग्रामीण भागातील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात क्रीडा शिक्षक आणि पुढे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळवून दिली.

कबड्डीसोबतच खो-खो, कुस्ती, धावणे, आर्चरी, शूटिंग, बॉक्सिंग आणि व्हॉलीबॉल या विविध क्रीडा प्रकारांच्या विकासासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे आणि जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.

या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती साहेबराव घाडगेपाटील, उपाध्यक्षा ॲड. सौ. स्नेहल चव्हाणपाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमलेपाटील, कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमलेपाटील, चेतन चव्हाणपाटील, अधिरथ पवार तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींनी प्राचार्य काळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे