उदया शिरसगाव येथे भव्य शतकरी मेळावा.

भव्य शेतकरी मेळावा जनजागरण सप्ताह शिरसगाव येथे दिनांक ७-१२-२०२५ रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्याचा ७-१२ कोरा करण्यासंदर्भात जनजागरण सप्ताह होणार संपन्न…..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे माध्यमातून भव्य शेतकरी मेळावा जनजागरण सप्ताह संपन्न होणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमुख विषयी चर्चा होणार असून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा या संदर्भात शेतकरी संघटने कडून तसेच समस्त शेतकऱ्यांकडून सरकारला मागणी केली जाणार आहे.
यामध्ये प्रमुख मुद्दे
१- सर्व शेतकरी मालाची निर्यात बंदी उठवा,
२-महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार यांचे मायक्रो फायनान्स पतसंस्था तसेच खाजगी सावकार यांच्या कर्जातून मुक्तता करा.
३-दुधासह सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च आधारित हमीभाव मिळावा .
४-दोन साखर कारखान्याच्या अंतराची अट रद्द करा.
५-साखर आयुक्तालयाचे नाव ऊस उत्पादक आयुक्तालय झाले पाहिजे.
६-खरीप पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खातात वर्ग करण्यात यावा.
७- अतिवृष्टी अनुदान वंचित शेतकऱ्यांनाह अनुदान तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावे.
८-शेतकऱ्याच्या ऊसाला ७५०० रुपये दर प्रत्येक कारखान्याने जाहीर करावा.
९-हमीभाव केंद्र कायमस्वरूपी सुरू करण्यात यावेत.
१०-शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी.
११-शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्वामीनाथन आयोग लागू करून हमीभाव देण्यात यावा.
१२-दिनांक 26 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार एक वर्षापासून कर्ज वसुली थांबवली आहे कोणत्याही साखर कारखान्याने कपात करू नये.
१३-कुकडी कारखान्याचे थकीत शेतकऱ्याचे पेमेंट खात्यावर त्वरित वर्ग करावे .
१४-शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा.
१५-चालू गळीत हंगामा मध्ये पंधरा दिवसाच्या प्रत्येक कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यात पेमेंट वर्ग करावे.
१६-आवश्यक वस्तू कायदा भूसंपादन कायदे सिलिंग चे कायदे या सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करा.
१७-गाईच्या एक लिटर दुधाला एक लिटर डिझेल इतका दर द्यावा तसेच म्हशीच्या दुधाला एक लिटर पेट्रोल एवढा भाव मिळाला पाहिजे.
अशा विविध मागण्यांसाठी भव्य शेतकरी मेळावा जनजागरण सप्ताह जगदंबा लॉन्स शिरजगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे या शेतकऱ्याच्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील एडवोकेट उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अजित काळे हे उपस्थित असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरयांनी आपल्या न्याय हक्कासाठी या शेतकरी मेळावा जनजागरण सप्ताहासाठी शिरसगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेवासा शेतकरी संघटने केले आहे.




