Breaking
ई-पेपर

*तीन तासांहून अधिक संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा*

*उशिरा का होईना, पावसाच्या हजेरीने उकाड्यापासून नागरिकांना आराम*

0 9 5 0 2 3

*तीन तासांहून अधिक संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा*
*उशिरा का होईना, पावसाच्या हजेरीने उकाड्यापासून नागरिकांना आराम*

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यासह परिसरात उशिरा का होईना मान्सून पावसाने दमदार हजेरी लावत मंगळवारी संध्याकाळी दहा नंतर सलग तीन तासांहून अधिक काळ संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाडा व दमट वातावरणापासून नागरिकांनाही आराम मिळाला आहे.
यंदा पावसाच्या आगमनास विलंब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, झालेल्या पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला असून पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही सुरुवात केली आहे.
पावसामुळे रस्त्यांच्या कडेला व शेतशिवारात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून असह्य उष्णता व उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे