Breaking
ई-पेपर

*शिरसगाव येथे पोटे दाम्पत्यांचे पाचवे पुण्यस्मरण उत्साहात*

*ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या जाहीर हरिकीर्तनातून परमार्थ, सत्कर्म आणि सत्य आचरणाचा संदेश*

0 9 5 0 2 3

*शिरसगाव येथे पोटे दाम्पत्यांचे पाचवे पुण्यस्मरण उत्साहात*

*ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या जाहीर हरिकीर्तनातून परमार्थ, सत्कर्म आणि सत्य आचरणाचा संदेश*

नेवासा प्रतिनिधी –

शिरसगाव, ता. नेवासा येथील पोटे कुटुंबीयांच्या वतीने आसराबाई एकनाथ पोटे व एकनाथराव परशुराम पोटे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ, वारकरी, टाळकरी, महाराज मंडळी, आप्तेष्ट तसेच पोटे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी कीर्तनातून मार्गदर्शन करताना ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले, “माणसाने जीवन असे जगावे की आपण गेल्यानंतरही आपल्या कार्याचा सुगंध समाजात दरवळत राहिला पाहिजे. पोटे दाम्पत्याने असेच आदर्श जीवन जगले.” संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ज्ञानोबारायांच्या जाण्याने जनाबाई, मुक्ताई यांच्यासह असंख्य संतांना दुःख झाले. एखादी व्यक्ती किती वर्षे जगली यापेक्षा तिने जीवन कसे जगले, समाजासाठी काय केले आणि मागे कोणता आदर्श ठेवला, याला अधिक महत्त्व आहे. उत्तम कीर्ती आणि समाधानाचे जीवन जगायचे असेल तर परमार्थ व सत्कर्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे.
पोटे दाम्पत्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे पाहताना “हे केवळ पुण्यस्मरण नसून जणू सप्ताहच सुरू असल्याचा अनुभव येत आहे,” असे गौरवोद्गारही महाराजांनी काढले.
जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, माणूस जिवंत असेपर्यंत कीर्तन, प्रवचन आणि संतविचार ऐकून ते आचरणात आणले पाहिजेत. देवासोबत घुमवा-घुमवी करू नका; तो सर्व काही जाणतो. नेहमी सत्याने वागा. परमेश्वराने आपल्याला नरदेह दिला आहे, हेच मोठे भाग्य आहे.
गेलेली संपत्ती, प्रॉपर्टी किंवा सत्ता पुन्हा मिळवता येऊ शकते; मात्र मृत्यूनंतर देवाला ‘मॅनेज’ करता येत नाही. पृथ्वीवर असताना केलेल्या पुण्यकर्माचेच फळ पुढील प्रवासात मिळते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण सत्कर्म, समाजसेवा आणि देवाच्या चिंतनासाठी वापरला पाहिजे, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
एकनाथराव परशुराम पोटे यांच्या निधनानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नी आसराबाई एकनाथ पोटे यांचेही निधन झाले. पती-पत्नीतील अतूट प्रेम, जिव्हाळा आणि सहजीवनाचे हे उदाहरण असल्याचे सांगत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी पोटे दाम्पत्याच्या जीवनकार्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
“जीवनातील वेळ वाया घालवू नका. मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. प्रत्येक क्षण देवाच्या चिंतनात आणि चांगल्या कार्यात घालवा. मानवी जन्म मिळाल्यानंतर संतांचा किंवा देवाचा दास झाला पाहिजे. संतांच्या शरण गेल्यानंतर जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही,” असेही त्यांनी सांगितले. निष्काम भावनेने, परिपूर्ण श्रद्धेने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणाऱ्यालाच खरा ‘दास’ म्हणता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाचव्या पुण्यस्मरण सोहळ्यास ज्ञानदेव एकनाथ पोटे, दत्तात्रय एकनाथ पोटे, सोपान एकनाथ पोटे, दादासाहेब एकनाथ पोटे, विठ्ठल एकनाथ पोटे, संजय एकनाथ पोटे तसेच समस्त पोटे परिवार उपस्थित होता.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माऊली पेचे, भाजप जिल्हाध्यक्ष ऋषिकेश शेटे, अशोक शेठ चौधरी, बबनराव पिसोटे, शिवाजीराव मते, प्रदीप ढोकणे, श्रीरंग हारदे, अशोक दरवडे, नानासाहेब नवथर, मनोज पारखे, सिद्धांत नवले, दिनकर गर्जे, अंकुश काळे, सतीशराव कर्डिले, राजेंद्र मते, नवनाथ साळुंके, पांडुरंग लंघे, सुनील लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ह.भ.प. अशोक महाराज निरपळ, लक्ष्मण महाराज नांगरे, कृष्णा महाराज हारदे, रामकृष्ण महाराज काळे, शिवाजी महाराज बिरदवडे, चंद्रकांत महाराज चव्हाण, नवनाथ महाराज आगळे, चैतन्य महाराज नवले, निलेश महाराज कडू, प्रल्हाद महाराज कांबळे, दत्तात्रय महाराज नवथर, काका महाराज देशमुख, अशोक महाराज साळुंके, माऊली महाराज शिंदे यांच्यासह पोटे परिवारातील आप्तेष्ट, पाहुणे, ग्रामस्थ, वारकरी, महाराज मंडळी व टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे