वंजारवाडी गावातील दिनांक २६ रोजी झालेल्या चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीची आमदार लंघे कडून पाहणी..
संबंधित अधिकाऱ्यांना दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश.

वंजारवाडी गावातील दिनांक २६ रोजी झालेल्या चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीची आमदार लंघे कडून पाहणी..
संबंधित अधिकाऱ्यांना दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश…..
नेवासा प्रतिनिधी-
नेवासा तालुक्यातील सोनई जवळील वंजारवाडी गावात दि. 26 रोजी रात्री दहाच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळा मुळे वंजारवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार पण उपस्थित होते.
काल दि. 26 रोजी रात्री दहाच्या सुमारास नेवासा तालुक्यातील वंजारवाडी परिसरात वादळ वाऱ्यासह मोठा प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. वंजारवाडी परिसरात झालेल्या या चक्रीवादळा मुळे झाडे आणि पत्रे हे राहुरी शनिशिंगणापूर हायवे वर पडल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प होती. तसेच वंजारवाडी परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या घराचे व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
यावेळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तात्काळ वंजारवाडी गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वंजारवाडीतील आठ घरांचे सुमारे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा सोनईचे मंडलाधिकारी प्रशांत कांबळे व कोतवाल निमसे यांनी केला. वंजारवाडी गावात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्य घरांचे नुकसान झाले. वंजारवाडी गावातील प्रगतशील शेतकरी अहिल्याजी दराडे यांच्या कल्याणम लॉन मंगलकार्यालयाचे या वादळ वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. मंगलकार्यालयाचे छत आणि पत्रे, कापड, खुर्च्य आणि शोभेच्या वस्तूचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी नेवासाचे आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली. तसेच वंजारवाडीतील भाजपा कार्यकर्ते राजू दराडे यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. येथील राधाताई दराडे यांच्या घराचे वादळ वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. सोनईच्या आदर्श विद्या मंदिरचे शिक्षक अशोक दराडे यांच्या घराजवळ झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच वंजारवाडी मध्ये अनेक शेतकऱ्यांच्य घरावरील छत पत्रे उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले.
वंजारीवाडीतील अनेक शेतकऱ्यांच्या फळबाग आणि पिकांची पण प्रचंड नुकसान झाले. यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी ता वंजारवाडी येथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली. नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार उपस्थित होते.
वंजारीवाडीतील अनेक शेतकऱ्यांच्या फळबाग आणि पिकांची पण प्रचंड नुकसान झाले. यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तात्काळ वंजारवाडी येथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार उपस्थित होते. त्यांना वंजारवाडी परिसरातील नुकसानी बाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले
. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लखवाल साहेब, कृषी अधिकारी बहऱ्हाटे साहेब, सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, सोनईचे मंडल अधिकारी प्रशांत कांबळे, वंजारीवाडीचे पोलीस पाटील रमेश डोळे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, भाजपाचे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सचिन दरंदले, भाजपा ओबीसी मोर्चाचे राजू दराडे, शिवसेनेचे राजेंद्र लांडे, ऋषिकेश शेटे, प्रमोद कुमावत, अशोक दराडे, अनिल तांदळे, सुधीर झिने यादी यावेळी आ. लंघे यांच्या समवेत उपस्थित होते.




