Breaking
ई-पेपर

*कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या निवासी इमारतीचे २६ जुलै रोजी लोकार्पण*

*आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार सुसज्ज निवासस्थान; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

0 9 5 0 2 3

*कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या निवासी इमारतीचे २६ जुलै रोजी लोकार्पण*

*आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार सुसज्ज निवासस्थान; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

 

नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील मौजे कुकाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन निवासी इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. श्रीप्रतराव काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे, चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ही निवासी इमारत उभारण्यात आल्यामुळे ग्रामीण भागात कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, तत्पर आणि रुग्णाभिमुख होण्यास मदत होणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले असून, कुकाणा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे