मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

नेवासा प्रतिनिधी.- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई यांच्या वतीने संस्थेअंतर्गत सर्व विद्यालये व महाविद्यालयांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील प्रांगणात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात कृषी महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य व संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे व सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्व. अजितदादा पवार व मुळा एज्युकेशन सोसायटी यांच्यात आपुलकीचे व जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते, असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या दिवशी संस्थेचे नियमित कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
फोटोओळी..
मुळा एज्युकेशन सोसा सोनई येथे उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.




