Breaking
ई-पेपर

*पत्रकार सुखदेव फुलारी निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित*

संत सुडके महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण*

0 9 5 0 2 3

*पत्रकार सुखदेव फुलारी निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित*

संत सुडके महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कांगोणी फाटा येथील संत सुडके महाराज आश्रमाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भेंडा येथील पत्रकार जलमित्र सुखदेव फुलारी यांचा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील व सिनेकलावंत बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते शाल, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन साहित्यिक व विविध सेवाकार्यात योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

पारायण सप्ताह निमित्त काल्याचे किर्तन झाल्यानंतर आश्रमाचे प्रमुख बाळकृष्ण महाराज सुडके यांनी प्रास्ताविक भाषणात आश्रमाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आध्यात्मिक उपक्रमांची माहिती दिली. सेवानिवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील, सिनेकलावंत बाळासाहेब शिंदे, जनार्दन महाराज मुंडे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ, आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक सुनील मंगेश जाधव,आबासाहेब घावटे,काशिनाथ माटल (कथा संग्रह),डॉ. प्रमोद चौधरी ,सतिश नाईकवाडे,विठ्ठल पांडुरंग पाटील (आत्मचरीत्र व्यक्ती चरीत्र),
शेखर खंडेराव फराटे,ऋषिकेश रोहीदास गोल्हार,राजेश चौरे(कादंबरी),सौ.वासंती प्रकाश घाडगे,प्राचार्य रेखा दीक्षित, कोल्हापूर, विजया लक्ष्मी  देवगोजी(प्रवास वर्णन),डॉ.दिनेश वाघुंबरे, डॉ योगेश गोतारणे, ऊर्मिला चाकुरकर (ललित),उदय गणपत जाधव, डॉ.श्रीकांत पाटील(नाटक), ज्ञानोबा दयारामजी  हटवार (संत साहित्य),इंद्रजित पाटील,एकनाथ देशमुख,अरविंदा राजधर भामरे, आकाश हरिभाऊ भोरडे,चंद्रकांत पोतदार(काव्य संग्रह),उत्तम सदाकाळ,मुरहारी कराड, बबन शिंदे (बाल साहित्य) यांना राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सोपानराव शिकारे यांना ग्रामिण उद्योग व्यवसाय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर येथील डॉ.महेंद्र शिंदे  यांना धन्वंतरी पुरस्काराने, कु.प्राजक्ता कचरे यांना शैक्षणिक गुणवत्ता पुरस्काराने तर महेश रहाटळ यांना प्रगतशिल कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले. योगेश रासने यांनी आभार मानले. ओंकार महाराज सुडके यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाकरीता विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे