Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

*पेशवाई श्रीमंतच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज माऊली सभागृहात ‘सौ-भाग्यवती’ व मनोरंजन धमाल महोत्सव*

0 9 5 0 2 3

*पेशवाई श्रीमंतच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज माऊली सभागृहात ‘सौ-भाग्यवती’ व मनोरंजन धमाल महोत्सव*

अहिल्यानगर, – (महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क )

अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथील नावाजलेले वस्त्रदालन *पेशवाई श्रीमंत* आपल्या यशस्वी वाटचालीतील *७ वर्षे पूर्ण करून ८ व्या वर्षात* पदार्पण करत आहे. या आनंदाचे औचित्य साधून *‘साजरा करूया आपल्या यशाचा उत्सव – वस्त्रोत्सव’* या संकल्पनेतून आज *अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात* एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज *सायंकाळी ५ ते ८ या वेळेत* होणारा हा सोहळा महिलांसाठी खास असणार आहे. यानिमित्ताने *‘सौ-भाग्यवती’* हा विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम आणि *‘सूर, ताल आणि खेळ – सख्यांचा आनंदाचा सुवर्णमेळ’* या नावाने मनोरंजनाची धमाल उडणार आहे. महिलांसाठी खेळ, पैठणीचा थाट, गाणी आणि आकर्षक भेटवस्तूंची लयलूट असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा प्रसिद्ध *सेलिब्रिटी अँकर आणि सिंगर संदीप पाटील* हे सांभाळणार असून त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात अधिकच रंगत येणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्याला शहरातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा *सौ. धनश्रीताई सुजय विखे*, माजी नगरसेविका *सौ. शितलताई संग्रामभैय्या जगताप* आणि अहिल्यानगरच्या महापौर *सौ. ज्योतीताई अमोल गाडे* या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पूनम श्रीवास्तव, नगरसेविका व उद्योजिका मीनल भोसल्या गांधी, प्रिया जानवे, वंदना ताठे, अभिनेत्री शैला कुलकर्णी यांच्यासह एकूण १९ मान्यवर महिला या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

गेली सात वर्षे ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच पेशवाई श्रीमंत हा टप्पा गाठू शकले, अशी भावना आयोजक *राहुल येमूल आणि अमोल येमूल* यांनी व्यक्त केली असून या उत्सवात सर्व महिला ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पेशवाई श्रीमंत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे