Breaking
ई-पेपर

गोरक्षनाथ मते गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त नातू राहुल डोळस यांचा सलाबतपुर प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून नातवाने केली आजोबांची पुण्यतिथी केली साजरी.

0 6 0 5 4 5

गोरक्षनाथ मते गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त नातू राहुल डोळस यांचा सलाबतपुर प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून नातवाने केली आजोबांची पुण्यतिथी केली साजरी….

नेवासा प्रतिनिधी –

सलाबपूर येथील रहिवासी असलेली गोरक्षनाथ मते यांची पुण्यतिथी नातवाने केली शालेय बालगोपाळांसमवेत साजरी सलाबतपुर येथील रहिवासी असलेले गोरक्षनाथ मते यांची पुण्यतिथी नातू राहुल डोळस यांनी सलाबतपुर येथील प्राथमिक शाळेमधील बालगोपाळांच्या समवेत मिठाईचे वाटप करून साजरी केली व आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी नातू राहुल डोळस बोलताना म्हणाले की आमचे आजोबा हे गुरुजी म्हणून कार्यरत होते त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली परंतु त्यांची आठवण व त्यांची शाळेशी जोडलेली नाळ हे आम्हाला नेहमी प्रेरणादायक ठरली आहे.

त्यांची शाळेला जोडलेली नाळ आजही आठवणींना उजाळा देत आहे आमच्या आजोबांनी अनेक विद्यार्थी घडवली त्यामध्ये अनेक उच्च पदावरती कार्यरत आहेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या आजोबांच्या पुण्यतिथीचे अवचित साधून आज नातू या नात्याने त्यांची पुण्यतिथी आगळ्यावेगळ्या पद्धतीने शाळेमध्ये लहान लहान मुलांच्या सानिध्यात साजरी करण्याची संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि आज मी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लहान मुलांना मीठाही वाटप करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. हीच त्यांना माझी आदरांजली नातू या नात्याने राहुल डोळस यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.

राहुल डोळसे सलाबतपुर येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे राहुल डोळस यांचा नेहमी सामाजिक, धार्मिक, क्षेत्र मध्ये मोठा सहभाग सलाबतपुर मध्ये असतो तसेच राहुल डोळसे हे प्रगतशील शेतकरी म्हणून सलाबतपुर परिसरामध्ये नावलौकिक आहेत.

या पुण्यतिथीच्या कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भांड सोपान चावरे, राहुल डोळस ,किशोर चुत्तर, , रोहिदास भगत ,वैभव पिसे, सुनील निकम ,दत्तात्रय मते, नंदकुमार भगत, श्रीकृष्ण गवळी, राज्जाक भाई शेख, मुख्याध्यापक विजय झावरे, राजेंद्र मुंगसे, सलीम शेख, राहुल लोखंडे, विठ्ठल घोडके, नितीन दळवी, बेबी सय्यद, अश्विनी कोल्हापुरे, पल्लवी कोल्हे आदी शिक्षक शालेय स्टाफ व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे