संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ व लाडक्या बहिणींचे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम होणार संपन्न..

नेवासा –
गुरुवार 30 जानेवारी रोजी नेवासा फाटा येथे लक्ष्मी मंगल कार्यालय ते आ.विठ्ठलराव लंघे यांच्या वतीने नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणीसाठी व माता-भगिनींसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ व लाडक्या बहिणींचे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम होणार संपन्न..
गुरुवार दि.30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नेवासा फाटा येथे लक्ष्मी मंगल कार्यालयात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ यांच्यावतीने माता भगिनींसाठी व लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम नेवासा फाटा येथे लक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे .नेवासा तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आ. विठ्ठलराव लंघे मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आ. विठ्ठलराव लंघे मित्रमंडळाच्या वतीने सर्व लाडक्या बहिणी व माता भगिनींना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून धनश्री डॉ. सुजय विखे पाटील अध्यक्ष स्पेशल ऑलम्पिक अहिल्यानगर सिंधुताई ए.विखे पाटील रणरागिणी महिला मंडळ तसेच
लाडकी बहीण योजनेच्या नाशिक जिल्हा शिवसेनाप्रमुख उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक सौ. संगीता नेवील खोडाना या उपस्थित राहणार आहेत. तसेच मनोरंजन म्हणून विराज शिंदे दिग्दर्शक अभिनेता याप्रसंगी महिलांसाठी विविध मनोरंजन कार्यक्रम व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ .रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील व डॉ. तेजश्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले आहे सौ.रत्नामाला विठ्ठलराव लंघे पाटील व डॉ.तेजश्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील सर्व महिला माता भगिनींना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन केले आहे.