*सह्याद्री मोटर वर्क्स मुळे अकोल्याच्या वैभवात भर~ना.नरहरी झिरवाळ*

*सह्याद्री मोटर वर्क्स मुळे अकोल्याच्या वैभवात भर~ना.नरहरी झिरवाळ*
अकोले – अमोल वैद्य (संपादक )

सह्याद्री मोटर वर्क्स च्या निमित्ताने अकोल्याच्या वैभवात भर पडली आहे. सह्याद्रीच्या सिंहगर्जनेप्रमाणे या शोरूमचे नावही भविष्यात गर्जत राहील अशी अपेक्षा राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख, आजी~ माजी आमदार, खासदार एकाच व्यासपीठावर आले होते.
अकोले येथील इंजि.शशांक शिवाजी बिबवे यांच्या शेकईवाडी सह्याद्री मोटर्स वर्क्सच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ना. झिरवाळ बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनीही सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगी केशव बाबा चौधरी आमदार डॉक्टर किरण लहामटे,आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे,माजी आमदार वैभवराव पिचड, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले,अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, शिर्डी संस्थांन चे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर,ज्येष्ठ नेते जे डी आंबरे, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रांताध्यक्ष ऍड. वसंतराव मनकर,अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड के डी धुमाळ, आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे,जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊपाटील नवले, उद्योजक रामनाथ कळसकर नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी,उपनगराध्यक्ष शरद नवले, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, सीताराम देशमुख,सुनील दातीर, सुधाकर देशमुख, यशवंत आभाळे, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, शरदराव चौधरी,परबतराव नाईकवाडी,कैलासराव वाकचौरे,अशोकराव देशमुख,मच्छिन्द्र धुमाळ, प्रदिप हासे, डॉ. मनोज मोरे, कैलास शेळके,विकास शेटे, भानुदास तिकांडे, प्रकाश मालुंजकर, सुरेश गडाख, बाळासाहेब ताजणे,सीताराम वाकचौरे,बाळासाहेब नाईकवाडी, अशोकराव आरोटे,सचिन दराडे, भाऊसाहेब खरात, संदीप शेटे, दिलीप शहा,महेश नवले, शिवाजीराव नेहे,बाळासाहेब भोर,जगन देशमुख, माधवराव भोर,बबनराव नवले,प्रभाकर फापाळे,अशोकराव भळगट,कॉ. आर डी चौधरी, सुरेश खांडगे, राहुल देशमुख, नितीन नाईकवाडी,हेरंब कुलकर्णी,राजेश पाडेकर, ईश्वर वाकचौरे,डॉ. संदीप कडलग,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,विजय पोखरकर, हेमंत आवारी, विद्याचंद्र सातपुते,विलास तुपे,सचिन शेटे, डॉ. रविंद्र डावरे,डॉ. सुशिल बेनके, प्रा. पंकज नाईकवाडी, भारत पिंगळे, प्रा.दिपक जोंधळे,मुकुंद शिनगार, बाळासाहेब पाटील,वसंतराव बाळसराफ, विठ्ठलराव आरोटे, शंकरराव डोंगरे, सूर्यभान वैद्य, बाबासाहेब गुंजाळ,शाहिद फारुकी, पंढरीनाथ वाकचौरे,सुधाकर आरोटे, बबनराव नवले,भारत वाकचौरे,बाबाजी ढगे, अर्जुन गावडे, राजेंद्र सोनवणे, अनिल चासकर,रविंद्र कोंडार, शशिकांत चौधरी,अक्षय आभाळे, रमेश नाईकवाडी,योगेश देशमुख, ऍड. संजय अरगडे, रावसाहेब नवले,मारुती भिंगारे, संजय हासे, बाबासाहेब दातखिळे, विजय पवार, इंजि. प्रदिप नाईकवाडी, बबलू धुमाळ, प्रकाश साळवे, उत्तम शेणकर,सुनील कोटकर, विष्णुपंत वैद्य, माधवराव वैद्य, रोहिदास वैद्य,संतोष देशमुख, दयानंद वैद्य, डॉ. धनंजय वैद्य, बी डी वैद्य, शांताराम वैद्य, सचिन वैद्य, सुधाताई देशपांडे, पुष्पाताई वाणी, प्रतिमा कुलकर्णी,
यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अकोले तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने नामदार झिरवाळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना ना.नरहरी झिरवाळ म्हणाले, चालू वर्षाच्या दुष्काळातून आपल्या सर्वांना सावरण्यासाठी बळ व ऊर्जा मिळो, अशी प्रार्थना अगस्ती महाराज चरणी या निमित्ताने करू यात.सह्याद्री मोटर वर्क्स चे संचालक शशांक बिबवे यांना उज्ज्वल यशासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोलेतील आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.देशात औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीचा इतिहास पाहिला तर विरोध तर होताच पण समर्थन देखील होते.त्यामुळे आज देश कुठल्या कुठे चालला आहे.पुढच्या कार देखील आपल्याला या देशात आणायच्या आहे.याचा सुतोवाच ना. नितीन गडकरी यांनी केल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.ए आय मुळे 2030 मध्ये पूर्ण पणे जग बदललेले असेल. आता या क्रांतीला सामोरे जाऊन सह्याद्री मोटर वर्क्स सूर केले आहे. बदलत्या जगाबरोबर अकोले सारख्या आदिवासी भागात हे अद्ययावत असलेले हे पहिले शोरूम आहे.या व्यवसायाला भविष्य चांगले आहे. कोणत्याही व्यवसायात सचोटी व प्रामाणिकपणा आवश्यक असतो असे सांगत नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले ~माजीमंत्री मधुकरराव पिचड साहेब यांनी तालुक्यात पाणी अडविण्याचे मोठे काम केल्यामुळे, छोटे मोठे धरणांची शृंखला निर्माण झाली.पाण्या मुळे तालुक्यात समृद्धी आली,बहुजन समाजातील युवक व्यापार व्यवसायात उतरले आहेत.त्यामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे.बिबवे परिवाराने अकोले मध्ये चारचाकी वाहनांसाठी नवीन दालन उघडल्याने वाहन धारकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे आता अकोलेकरांना नाशिकच्या हिरामोती कडे जाण्याची गरज पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आ.अमोल खताळ म्हणाले की,कोणताही व्यवसाय असो तो प्रामाणिकपणे व सचोटीने केल्यास यश निश्चित पणे मिळत असते.पुणे, मुंबई, नाशिक या मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा आता अकोले शहर व तालुक्यात मिळणार आहे. त्यामुळे अकोले तालुका ग्रामीण आहे असे म्हणणे चुकीचे आहे. अकोले तालुका आता प्रगती कडे वाटचाल करीत असून बिबवे परिवाराने चार चाकी वाहनांच्या सुशोभीकरनाचे मोठे दालन उघडले आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विविध व्यवसायाच्या निमित्ताने अकोले शहराचा चेहरा मोहरा बदलत चालला असल्याचे सांगत नूतन व्यवसाया निमित्त बिबवे परिवाराला सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आ. डॉ. किरण लहामटे,ज्येष्ठ नेते जे डी आंबरे पाटील,मधुकरराव नवले, कॉ. कारभारी उगले, डॉ. जालिंदर भोर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रास्ताविक व स्वागत पत्रकार अमोल वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन हभप दिपक महाराज देशमुख व प्रकाश आरोटे यांनी केले तर आभार नगरसेविका सौ. शितल बिबवे~ वैद्य यांनी मानले.बिबवे परिवाराच्या वतीने मधुकर बिबवे, शिवाजी बिबवे, गणपत बिबवे, डॉ. नितीन बिबवे, निलेश बिबवे,शरद बिबवे, अरुण बिबवे, सतीश बिबवे,स्वप्नील बिबवे,सोमनाथ डोंगरे, सौ. शुभांगी डोंगरे, अरुण शिंदे, सौ. मनिषा शिंदे आदिनी पाहुण्यांचे स्वागत केले.
चौकट ~कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंत्री झिरवाळ यांना विनंती केली की, तुमच्या अगोदर मी बोलतो, नंतर तुम्ही बोला,आता अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो कारण मी सुद्धा अध्यक्ष राहिलो आहे.या काळात अनेक वयाने मोठे असलेल्यानाही “तुम्ही खाली बसा,तुम्ही उभे राहा” असे आदेश देत होतो. शेवटी अध्यक्षांचे आदेश महत्वाचे असतात अशी सभागृहातील आठवणही त्यांनी या निमित्ताने करून दिली.यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.




