Breaking
ई-पेपर

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांची सौंदाळा शाळेस सखोल भेट.

0 6 0 5 4 5

*मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांची सौंदाळा शाळेस सखोल भेट

नेवासा –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर साहेब यांनी सुमारे दोन तास आकस्मिक,सखोल भेट दिली.
यामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम इयत्ता पहिलीच्या दोन विद्यार्थिनींनी साहेबांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व टीमने शालेय शौचालयाची पाहणी केली. मुले आणि मुलींचे शौचालय स्वच्छ असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सध्या शाळेत चालू असलेल्या स्वतंत्र शौचालयाच्या बांधकामाचा आढावा घेतला. नंतर अर्धवट असलेल्या संरक्षण भिंती बद्दल विचारणा केली. माननीय साहेबांनी त्याच ठिकाणावरून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून संरक्षक भिंती बाबत आढावा घेतला.
यानंतर इयत्ता पाचवी अ च्या वर्गात भेट केली. यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. इसरो साठी निवड झालेल्या समर्थ ढेरे या विद्यार्थ्याला संबंधित सहलीतील अनुभव विचारले.
यानंतर माननीय साहेबांनी इयत्ता पाचवी ब चा वर्ग भेट केली. वर्गात चालू असलेल्या नवोदय परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नवोदयच्या 114 सराव पेपर सोडविले असल्याबाबत साहेबांना सांगितले. विद्यार्थ्यांची तयारी तपासण्यासाठी नवोदय साठीचे एक उदाहरण साहेबांनी फलकावर विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले.
वर्गातील सानिका घुले या विद्यार्थिनीने सर्वांसमोर फलकावर ते उदाहरण सोडून दाखवले. नवोदयच्या तयारीबाबत असे उदाहरण सोडवल्यानंतर साहेबांनी खूप समाधान आणि अभिनंदन व्यक्त केले. जिल्ह्यात चालू असलेल्या मिशन आरंभ च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय साहेबांनी मागितला.
तसेच यावेळी पाचवीच्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेत जितके विद्यार्थी राज्य,जिल्हा यादीत निवड होतील त्याचप्रमाणे जितक्या विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड होईल त्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांसहित जिल्हा परिषदेत स्वतः सत्कारासाठी आमंत्रित करू असे मुलांना आश्वासन दिले.
पाचवीच्या वर्गाच्या उत्कृष्ट तयारीबद्दल पाचवी चे वर्गशिक्षक श्री कल्याण नेहुल आणि श्री रवींद्र पागिरे यांचे विशेष अभिनंदन केले.

यानंतर इयत्ता चौथीचा वर्ग साहेबांनी सखोल तपासणी केली. यामध्ये इयत्ता चौथीच्या मिशन आरंभच्या नऊ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने पुरविलेल्या पुस्तिका विद्यार्थ्यांनी सोडवून घेतल्या असल्याबाबत तपासणी केली. त्यातील निवडक उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिली. विद्यार्थ्यांनी समाधानकारक रित्या उदाहरणे सोडवली.
याच वर्गातील जिल्हा विविध गुणदर्शन स्पर्धेत वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या गौरी भांड या विद्यार्थिनीचा साहेबांनी स्वतः सत्कार केला.
यानंतर मिशन आरंभ च्या तिसऱ्या चाचणीमध्ये इयत्ता पाचवीच्या जिल्हा यादीत निवड झालेल्या जवळपास 30 विद्यार्थ्यांचा साहेबांनी स्वतः पेन देऊन सत्कार केला.
यानंतर माननीय साहेबांनी क्यू आर कोड ॲप किती जणांनी इन्स्टॉल केले याबाबत स्वतः मोबाईल बघून खात्री केली. त्याचप्रमाणे तालुका आणि केंद्रामधील किती शिक्षकांनी ॲप इन्स्टॉल करून कार्यवाही चालू केली आहे याबाबत आढावा घेतला. तसेच माननीय साहेबांनी क्यू आर कोड च्या ॲप बद्दल स्वतः शिक्षकांकडून डेमो घेतला. तसेच सर्व शिक्षकांनी तात्काळ हे ॲप सुरू करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी एकूणच आढावा घेताना सौंदाळा शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता ही अतिशय उल्लेखनीय असल्याबाबत माननीय साहेबांनी सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक केंद्रप्रमुख त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. तालुक्याच्या ठिकाणावरून आणि परिसरातील गावांतून या शाळेत विद्यार्थी येत असल्याबाबत प्रत्येक वर्गात आढावा घेतला आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.

यावेळी सौंदाळा शाळेमध्ये तालुका गटविकास अधिकारी श्री संजय लखवाल साहेब,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री कासार साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड साहेब, केंद्रप्रमुख श्री सुखदेव सोनवणे साहेब यांच्या नियंत्रणात मुख्याध्यापक श्री पोपटराव घुले यांच्या मार्गदर्शनामध्ये शाळेतील श्री राजेश पठारे,श्री किशोर विलायते,श्रीमती कल्पना निघुट आणि श्रीमती बिरू भवानी,श्रीमती संजीवनी मुरकुटे हे शिक्षक उपस्थित होते. यावेळी माननीय साहेबांना सत्कार ऐवजी शाळेतील शिक्षक श्री रवींद्र पागिरे यांनी तयार केलेले इयत्ता पाचवी चे शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
एकंदरीत शैक्षणिक दृष्ट्या उत्कृष्ट गुणवत्ता असलेली एक सुंदर शाळा म्हणून सौंदाळा शाळेचा उल्लेख साहेबांनी केला….. या यशाचे व गुणवत्तेचे सर्व श्रेय शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांना जाते आहे असे साहेबांनी आवर्जून सांगितले.
तसेच यावेळी ग्रामपंचायत कडून शाळेला देण्यात आलेल्या सोलर सिस्टिम,सीसीटीव्ही,इंटरॅक्टिव्ह पॅनल,पाण्याची भौतिक सुविधा,शौचालय, एलईडी टीव्ही या मूलभूत सुविधा शाळेला परिपूर्ण उपलब्ध करून दिल्या बाबत माननीय साहेबांनी संपूर्ण ग्रामपंचायत,सरपंच श्री शरद आरगडे , ग्रामसेविका श्रीमती प्रतिभा पिसोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांचे जाणीवपूर्वक अभिनंदन केले.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे