पोलीस दलात उत्तम कामगिरी बद्दल शिवाजी कचरे यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह..

पोलीस दलात उत्तम कामगिरी बद्दल शिवाजी कचरे यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह..
नेवासा प्रतिनिधी-
विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातून एकूण ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील सुपुत्र शिवाजी राजाराम कचरे यांचा या यादीत समावेश आहे,
यात छत्रपती संभाजीनगर
शहर पोलिस दलातून यासाठी यंदा ३५ अधिकारी व अंमलदारांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच २१ अधिकारी व अंमलदारांना हा सन्मान जाहीर झाला.
राज्यात गडचिरोली, मुंबई शहरानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाला सर्वाधिक पदके जाहीर झाली आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या पदक, सन्मानचिन्हाने सर्वांना गौरवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.




