Breaking
ई-पेपर

नेवासा बस आगाराबाबत पाठपुरावा करू-आ.लंघे

0 6 0 5 2 0

नेवासा बस आगाराबाबत पाठपुरावा करू-आ.लंघे

नेवासे (प्रतिनिधी)- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासे आगाराला नवीन बसेस तातडीने मिळवून देण्यासाठी व आगारातील चालक-वाहक विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, कामगारांच्या दैनंदिन कामकाजाबाबतीतील तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी योग्य पाठपुरावा करू, असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेवासे आगारात नवीन कार्यकारिणी व फलक अनावरणप्रसंगी ते बोलते होते.

यावेळी पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्ष अॅड.पुष्पा येळवंडे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, किरण पावसक, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या धोरणात्मक निर्णयाची दखल घेत नेवासे आगारातील अनेक चालक व वाहक राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे स्वतःहून सभासद झाले. त्यामु‌ळे ही बाब अत्यंत आनंददायी आहे, असेही लंघे म्हणाले. यावेळी नेवासे आगाराची नवीन कार्यकारिणी सादर करण्यात आली व सर्व कर्मचारी यांचा उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसैनिक व राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे