Breaking
ई-पेपर

पिंपरी शहाली जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा कबड्डी संघ अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम.

0 6 0 5 1 9

पिंपरी शहाली जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा कबड्डी संघ अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा श्री हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय त्रिमूर्तीनगर या ठिकाणी १४ फेब्रूवारी रोजी पार पडल्या.

यावेळी मुलांच्या मोठ्या गटातील कबड्डी स्पर्धेत पिंपरी शहाली शाळेतील मुलांच्या संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीने खेळ करत अंतिम सामन्यात राहुरी तालुक्याच्या संघाला नमवत प्रथम क्रमांक पटकावला. या संघामध्ये रोहित नवथर (संघनायक), सुरज कचरे, सिद्धार्थ उभेदळ, असद शेख, महेश मोरे, सार्थक नवथर, आदेश बनकर, प्रणव कुऱ्हाडे, असद सय्यद, जयदीप कांबळे, इम्रान पठाण, रोहन नवथर, आदित्य नवथर, पुष्कर कुऱ्हाडे, समर्थ राशीनकर, श्रेयस बनसोडे या मुलांचा सहभाग होता. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोपे सर, रामनाथ खरड सर, नवनाथ काळे सर, नवनाथ फुलारी सर, विठ्ठल काळे सर, रविंद्र चंदन सर, सतिश धनवडे सर, दादासाहेब काळे सर, सौरभ नवथर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल नेवासा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड, विस्तार अधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख नामदेव दहातोंडे, नामदेव शिरसाट, पिंपरी शहाली गावच्या सरपंच पूर्णिमा चंदन, उपसरपंच अमोल ठोंबळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महंमद शेख, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे