Breaking
ई-पेपर

*श्री संत किसन महाराज सुडके संस्थानचे राज्यस्तरीय साहित्य गौरव व पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

*भेंडा येथील सुखदेव फुलारी यांना ‘राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’; कुकाण्याच्या प्राजक्ता कचरे यांना शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार*

0 9 5 0 2 3

*श्री संत किसन महाराज सुडके संस्थानचे राज्यस्तरीय साहित्य गौरव व पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

*भेंडा येथील सुखदेव फुलारी यांना ‘राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’; कुकाण्याच्या प्राजक्ता कचरे यांना शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार*

नेवासा | तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थानच्या वतीने सन २०२६ साठी देण्यात येणारे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार आणि पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांची ‘राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’ यासाठी निवड करण्यात आली असून, कुकाणा येथील कु. प्राजक्ता कचरे यांना ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्य, पत्रकारिता, ग्रामीण उद्योग, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे.

संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य बाळकृष्ण महाराज सुडके यांनी ही माहिती दिली. आध्यात्मिक कार्यामध्ये साहित्याचे महत्त्व अधोरेखित करताना वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि नेवासा येथील पैसखांब मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केल्याचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने साहित्य गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांसाठी विविध वाङ्मय प्रकारांतील तब्बल १६५ पुस्तके प्राप्त झाली होती. तज्ज्ञ परीक्षकांनी या पुस्तकांचे परीक्षण केल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार २०२६ चे मानकरी

कथा संग्रह: सुनील मंगेश जाधव (मर्म), आबासाहेब घावटे (लावण्या), काशिनाथ माटल (सावट).

आत्मचरित्र व व्यक्तिचरित्र: डॉ. प्रमोद चौधरी (पैल तिरावरून तर असं झालं), सतीश नाईकवाडे (केकताड), विठ्ठल पांडुरंग पाटील (मायनस शून्य).

कादंबरी: शेखर खंडेराव फराटे (मानधुरा मी येतोय), ऋषिकेश रोहिदास गोल्हार (रानोबाचा माळ), राजेश चौरे (जिद्द पेरताना).

प्रवासवर्णन: सौ. वासंती प्रकाश घाडगे (देवाचिये द्वारी), प्राचार्य रेखा दीक्षित, कोल्हापूर (अमृत पर्यटनानुभव), विजयालक्ष्मी देवगोजी (मध्यरात्री सूर्य पाहणारा देश).

ललित लेख: डॉ. दिनेश वाघुंबरे (मराठी साहित्यातील लोक तत्त्वे), डॉ. योगेश गोतारणे (गाव शहराचा मागोवा), ऊर्मिला चाकूरकर (लेखकाचे घर).

नाटक: उदय गणपत जाधव (गार्गी), डॉ. श्रीकांत पाटील (रंजक नाट्यछटा).

संत साहित्य: ज्ञानोबा दयारामजी हटवार (ग्रामगीतेतील क्रांतीदर्शने).

काव्यसंग्रह: इंद्रजित पाटील (लापनिका), एकनाथ देशमुख (गाथा एक नाथा), अरविंदा राजधर भामरे (शापित कोलाहलाच्या नोंदी), आकाश हरिभाऊ भोरडे (झालं बाटुकाचं जिण), चंद्रकांत पोतदार (धुराच्या सैल वेलांट्या).

बालसाहित्य: उत्तम सदाकाळ (बोळातलं भूत), मुरहारी कराड (ये रे ये रे ढगोबा), बबन शिंदे (मस्त मजेत राहू).

विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय विशेष पुरस्कार

संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुढील मान्यवरांची विशेष पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

– निर्भीड पत्रकारिता पुरस्कार: सुखदेव फुलारी, भेंडा.
– ग्रामीण उद्योग व व्यवसाय पुरस्कार: सोपानराव शिकारे.
– धन्वंतरी पुरस्कार: डॉ. महेंद्र शिंदे.
– शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार: कु. प्राजक्ता कचरे, कुकाणा.
– प्रगतिशील कृषी पुरस्कार: श्री. महेश रहाटळ.

२५ ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

या सर्व पुरस्कारांचे वितरण रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थान येथे संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवर्य बाळकृष्ण महाराज सुडके यांनी दिली.

साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देतानाच पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण उद्योजकतेतील गुणवंतांच्या कार्याचा सन्मान करणारा हा उपक्रम ठरत असून, या पुरस्कार सोहळ्याकडे साहित्यप्रेमी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे