किती ही मोठ्या पदावर विराजमान झालो तरी गावची नाळ तुटू देणार नाही आ. लंघे…..
शिरसगाव जगदंब यात्रा उत्सवामध्ये आमदार लंघे यांचा सपत्नी सहभाग शिरसगावकरांचा आनंद द्विगुणित..

किती ही मोठ्या पदावर विराजमान झालो तरी गावची नाळ तुटू देणार नाही आ. लंघे…..
शिरसगाव जगदंब यात्रा उत्सवामध्ये आमदार लंघे यांचा सपत्नी सहभाग शिरसगावकरांचा आनंद द्विगुणित…..
नेवासा प्रतिनिधी- (मंगेश निकम)
शिरसगाव जगदंबा यात्रा उसामध्ये आमदार लंघे यांनी सपत्नी सहभाग नोंदवला यावेळी देवी मुखवटाच्या मिरवणुकीच्या दरम्यान आमदार लंघे व सौ.रत्नमाला ताई लंघे हे मनोभावे सहभागी झाले यामध्ये गावकऱ्यांचा दोघांच्या सहभागामुळे आनंदत्विक झाला.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे व सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांनी जगदंबा देवी माता मंदिरामध्ये येऊन जगदंबा मातेला साडीचोळी अर्पण केली तसेच पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये मंत्र उपचारांमध्ये पूजन केले व सर्व ग्रामस्थांना यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार लंघे म्हणाले की मी जगदंबा मातेच्या आशीर्वादाने तसेच लाडक्या बहिणीच्या कृपा आशीर्वादाने आज आमदार पदी विराजमान आहे . आज जरी आमदार पदी विराजमान असलो तरी तरीही कितीही मोठा झालो तरी मी गावची नाळ तुटे देणार नाही असे आ. विठ्ठलराव लंघे बोलताना जगदंबा माता मंदिर मध्ये बोलताना म्हणाले ते यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जगदंबा माता मंदिर व यात्रा उत्सवा मध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग सपत्नी सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांच्या समवेत नोंदवला .




