Breaking
ई-पेपर

कुकाणा विद्यालयाचा सर्वेश सदावर्ते राज्यात प्रथम

केवल फाउंडेशन धाराशिव ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत बाजी; खुल्या गटात पटकावला मान.

0 6 0 5 4 7

कुकाणा विद्यालयाचा सर्वेश सदावर्ते राज्यात प्रथम

केवल फाउंडेशन धाराशिव ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत बाजी; खुल्या गटात पटकावला मान

नेवासा (अहिल्यानगर )- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

केवल फाउंडेशन, धाराशिव यांच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी सर्वेश सचिन सदावर्ते याने खुल्या गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या य प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून एकूण ६६ स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत सर्वेशने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकली आणि विजेतेपद मिळवले. केवल फाउंडेशनच्या वतीने त्याला २ हजार रुपये
देऊन गौरविण्यात आले.
सर्वेशला लहानपणापासूनच वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे. सार्वजनिक कार्यक्रमांत व्याख्याने देणे आणि महापुरुषांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन इतरांना वाचनासाठी प्रेरित करण्यात तो नेहमीच अग्रेसर असतो. त्याच्या या यशात भाऊसाहेब देशमुख सार्वजनिक वाचनालय (कुकाणा), शाळेतील शिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्वेशचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे