एवढ्या बहिणी कोणत्या भावाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत:- आमदार लंघे…..
आमदार लंघे यांच्या वजनाइतके पेढे जगदंब माता देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जगदंबा माता चरणी शिरसगाव ग्रामस्थान केले अर्पण......

एवढ्या बहिणी कोणत्या भावाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत:- आमदार लंघे…..
आमदार लंघे यांच्या वजनाइतके पेढे जगदंब माता देवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जगदंबा माता चरणी शिरसगाव ग्रामस्थान केले अर्पण……
नेवासा- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे हे आमदार व्हावेत यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी नवस केले होते त्यामध्ये कोणी तुळजापूरला पायी जाण्याचा नवस होता तर कोणी जगदंब मातेला वजना इतकी पेढे तुला करणाऱ्याचा नवस होता तसेच काहींनी आमदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचाही पण केला होता अशा विविध प्रकारचे नवसाची पूर्तता आमदार लंघे आमदार झाल्यानंतर व त्यांना पहावयास मिळत आहे त्याच अनुषंगाने आज शिरसगाव येथे जगदंब यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आमदार लंघे यांच्या वजनाइतकी पेढे जगदंबा माता चरणी अर्पण करून वाटण्यात आले.
या वेळी आमदार लंघेंना बोलताना म्हणाले की एवढ्या बहिणी कोणत्या भावाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत असे बोलताना व गावचे ऋण व्यक्त करताना आ. लंघेंना गहिवरून आले व त्यांना त्यांच्याबद्दल जनतेचे प्रेम बघून त्यांना अश्रू अनावर झाले ते बोलताना म्हणाले की माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार बघून जनताही खुश झाली आहे आणि जनतेचे हे एवढे मोठे प्रेम मला भविष्यकाळामध्ये लढण्यासाठी बळ देणार आहे तसेच एवढ्या बहिणी कोणत्या भावाला नसतील तेवढ्या बहिणी मला आहेत तसेच प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींचे उपकार मला समोर दिसतात तसेच माझ्या लाडक्या बहिणींनी मतदान रुपी प्रेम दिले त्याची जाणीव ठेवून मी आज आमदार पदी विराजमान आहे. असे आमदार लंघे बोलताना म्हणाले आमदार लंघे यांच्या गावच्या यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने पेढे तुला करण्यात आली.
याप्रसंगी सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे तसेच शिरसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




