Breaking
ई-पेपर

श्री ज्ञानेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे वडाळ्यात माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत.

0 6 0 5 4 7

श्री ज्ञानेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे वडाळ्यात माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत.

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

ज्ञानेश्वरीचे रचनस्थान असलेल्या
नेवासा येथील श्री क्षेत्र नेवासा येथील
पायी दिंडी सोहळयात
यावर्षी 11 हजार वारकरी सहभागी झाले असून एकूण 25 दिंड्याचा सहभाग आहे.
गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत व
वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के
यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी
सोहळा मोठ्या भक्तिभावाने
पंढरपूरला मार्गस्त होत आहे
वडाळा येथे माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने
दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात
याप्रसंगी वडाळा व परिसरातील वारकरी ,माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी पायी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करून पालखीची पूजा केली.
व ह.भ.प रामभाऊ महाराज राऊत, ह..भ.प देविदास महाराज राऊत यांचा सन्मान केला
व पालखी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
दिंडीतील वारकरी मंडळीना
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले
याप्रसंगी ह भ प सेवानाथ महाराज
यांचे कीर्तन संपन्न झाले.प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी संजय लखवाल,सहाय्याक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर,शनिशिंगणापूरचे स पो नी आशिष शेळके यांनी दिंडी सोहळ्याचे
स्वागत केले.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे