*अवधूत लोहकरे युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*

*अवधूत लोहकरे युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*
भेंडा(प्रतिनिधी):– महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
येथील युवा सुवर्णकार
अवधूत लोहकरे यांना आंबेजोगाई येथील
अखिल सोनार समाज प्रतिष्ठाणकडून
युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले आहे.
श्री.क्षेत्र पंढरपूर येथे सन्मान सुवर्णरत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ पार पडला.अखिल सोनार समाज प्रतिष्ठान , आंबेजोगाई यांच्या वतीने सामाजिक संघटन करून,सामाजिक जाणिव जोपासणाऱ्या व पुढील पिढीस प्रेरणादायी असणाऱ्या विविध क्षेत्रातील सुवर्णरत्नांचा सन्मान करण्यात आला.
प्रेरणादायी युवा नेतृत्व असणाऱ्या भेंडा येथील व्यापारी, बालाजी ज्वेलर्सचे अवधूत लोहकरे यांना “युवा समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीगोंद्याचे सुप्रसिद्ध सराफ अनिलसेठ धर्माधिकारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री.संत नरहरी महाराज मंदिराचे विश्वस्त सुभाष वेदपाठक, श्रीनिवास बानकर, शिवानंद टाकसाळे,
अखिल सोनार समाज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष
सतिष पंडित, सचिव मनीषा पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अवधूत लोहकरे म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम’ उक्तीप्रमाणे आपापसातील मतभेत, गट-तट विसरून सर्वांनी एकाच छताखाली येऊन कार्य करावं. फक्त समाज बघत न बसता सर्वांनाच सोबत घेऊन कार्य केल्यास निश्चित प्रगती साधता येईल.




