Breaking
ई-पेपर

नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप

0 6 0 5 5 6

नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप

नेवासा(प्रतिनिधी) सुधीर चव्हाण

 

नेवासा बुद्रुक येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता काकासाहेब बोराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र परिवाराच्या वतीने नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात येऊन शालेय साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक शेषराव पाखरे यांनी स्वागत करत शाळेला भेट दिल्याबद्दल सहायक अभियंता काकासाहेब बोराडे यांना धन्यवाद देत आभार मानले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आला.ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला हातभार म्हणून गरजू मुलांना शालेय साहित्यासाठी पाच हजाराची आर्थिक मदत यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक रंगनाथ गुंजाळ,संतोष भांबरे,श्रीमती रतनबाई महांडुळे,श्रीमती मंदाकिनी हडप,श्रीमती प्रणिता कुलकर्णी,श्रीमती यमुना वासाल यांच्यासह सामाजिक कार्यकते बालू फसले व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे