Breaking
ई-पेपर

महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम निमसे यांचा ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर कामगारांच्या वतीने सन्मान.

0 6 0 5 4 5

महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम निमसे यांचा ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर कामगारांच्या वतीने सन्मान.

नेवासा -प्रतिनिधी-दि. 22

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या उपाध्यक्षपदी मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस डी एम निमसे यांची निवड झाल्यामुळे दि.२२/६/२५ रोजी मुळा कारखाना कार्यस्थळावर मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पडली. या मीटिंग मध्ये प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊशंकर पाटील यांचे सर्वांच्या वतीने आभार मानण्यात आले राज्यातील साखर कामगारांची ही राज्यव्यापी मोठी संघटना आहे. या संघटनेमध्ये निमसे यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.इथून पुढच्या काळामध्ये साखर कामगाराच्या प्रश्नासंदर्भात व संघटनेला बळ देण्याचे काम आपण करणार आहोत असा शब्द यावेळी निमसे यांनी पदाधिकाऱ्यासमोर दिला.महाराष्ट्र मध्ये सध्या साखर उद्योग अडचणीत आहे पण सर्व कामगारांच्या विश्वासाने यातून पुढे जाऊ असे निमसे म्हणाले. यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ कामगार कार्यकर्ते साखर कामगार जिल्हा समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोकराव आरगडे यांनी मिटींगला मार्गदर्शन करताना सांगितले की स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच मुळा कारखान्याचे संस्थापक यशवंतरावजी गडाख, माजी आमदार शंकररावजी गडाख, वृद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही कारखान्याचे कामकाज चांगले चालू आहे.

यावेळी ज्ञानेश्वर चे दत्तात्रय चोपडे शिवाजी ढवळे दत्तात्रय पवार भगवान चावरे रवींद्र निपुंगे तसेच वृद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ कामगार कार्यकर्ते शेषनारायण मस्के रावसाहेब मगर एकनाथ जगताप मच्छिंद्र केळकर मूळा कारखाना युनियन चे उपाध्यक्ष कारभारी लोडे खजिनदार सुभाष सोनवणे सहचिटणीस भारत पटारे कामगार संचालक विश्वास डेरे किशोर राजगुरू यावेळी उपस्थित होते शेवटी संघटनेचे खजिनदार सुभाष सोनवणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे