Breaking
ई-पेपर

*आर्ले पाटील अर्बन पतसंस्थेच्या संचालकपदी एकनाथराव कावरे यांची निवड*

दिवाळीनिमित्त सभासद व खातेदारांना मिठाई वाटप; कर्मचाऱ्यांना बोनस देऊन संस्थेच्या वतीने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित*

0 9 5 0 3 7

*आर्ले पाटील अर्बन पतसंस्थेच्या संचालकपदी एकनाथराव कावरे यांची निवड*

दिवाळीनिमित्त सभासद व खातेदारांना मिठाई वाटप; कर्मचाऱ्यांना बोनस देऊन संस्थेच्या वतीने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित*

नेवासा तालुका | प्रतिनिधी-

सहकार क्षेत्रात विश्वासार्हता, आर्थिक शिस्त आणि ग्राहकाभिमुख कारभाराच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कुकाणा येथील आर्ले पाटील अर्बन सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी कुकाण्याचे माजी सरपंच एकनाथराव पाटील कावरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी निश्चितच फायदा होणार आहे. दरम्यान, दिवाळी सणाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सर्व सभासद व खातेदारांना मिठाईचे वाटप करण्यात आले, तर कर्मचाऱ्यांना बोनस देऊन दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.

एकनाथराव पाटील कावरे यांनी दोन वेळा कुकाणा गावाचे सरपंचपद भूषविले असून, बाजार समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच पाणी वापर संस्थेसह विविध सहकारी आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ग्रामीण विकास, सहकार क्षेत्र आणि संस्थात्मक कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग पतसंस्थेच्या कामकाजाला दिशा देण्यासाठी आणि भविष्यातील विस्तारासाठी होणार आहे. अनुभवी नेतृत्वाची संचालक मंडळात झालेली निवड ही संस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक डॉ. गणेश आर्ले, चेअरमन सौ. मीना आर्ले, संचालक डॉ. यशवंत गवळी, डॉ. अरुण वाबळे, श्रीमती रंजना कांडेकर आणि बाळासाहेब कोलते यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवर प्रदीप भंडारी, भागवत खराडे, डॉ. सुभाष भागवत, किशोर मिसाळ यांची उपस्थिती होती.

संस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या मेहनतीची आणि निष्ठेची दखल घेत दरवर्षीप्रमाणे यंदाही बोनस वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर सभासद आणि खातेदारांशी असलेले आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, या भावनेतून मिठाई वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सर्व सभासद, खातेदार आणि ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

नवीन संचालकांची निवड, अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि कर्मचारी व सभासदांशी जपलेले आपुलकीचे नाते या माध्यमातून आर्ले पाटील अर्बन पतसंस्था सहकार क्षेत्रातील आपली वाटचाल अधिक भक्कम करण्याच्या दिशेने प्रयत्नशील असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे