Breaking
ई-पेपर

*देवगाव व देडगाव परिसरातील वीज समस्यांबाबत आमदार विठ्ठलराव लंघे यांना निवेदन*

0 9 5 0 3 2

*देवगाव व देडगाव परिसरातील वीज समस्यांबाबत आमदार विठ्ठलराव लंघे यांना निवेदन*

नेवासा प्रतिनिधी : – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील देवगाव सबस्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या वीज समस्यांबाबत तसेच वीज पुरवठा अधिक सक्षम करण्याच्या मागणीसाठी विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देवगाव सबस्टेशन अंतर्गत असलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच वाढत्या वीज मागणीचा विचार करून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवा नेते आकाश चेडे व ग्रामस्थां तर्फे करण्यात आली.

याशिवाय माका सबस्टेशनवरून देडगाव परिसरासाठी स्वतंत्र गाव-१ शेती फीडर मंजूर करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम झाल्यास शेती व नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे