“योग्य कारण आणि योग्य तारण” पाहूनच बँकेचे कर्ज वाटप:
छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यांचे प्रतिपादन..

“योग्य कारण आणि योग्य तारण” पाहूनच बँकेचे कर्ज वाटप:
छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे अध्यक्ष अजय पाटील यांचे प्रतिपादन..
नेवासा प्रतिनिधी- मंगेश निकम
नेवासा फाटा मुकिंदपुर येथील छत्रपती राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेचा बारावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री अजय पाटील यांनी ग्राहकाभिमुख सेवा देण्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीमध्ये बँकेकडे 1490 कोटी ठेवीच्या स्वरूपात असून 879 कोटी कर्ज वाटप झाल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली . बँकेने नेहमीच तळागाळातील आर्थिक दुर्लभ घटकांसाठी वेगवेगळ्या योजना अंतर्गत आर्थिक स्वरूपात तसेच सामाजिक कार्यबाबत नेहमीच अग्रेसर मदत केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. योग्य कारण आणि योग्य तारण हेच बँकेचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सभासद आणि खातेदारांनी बँकेचे कर्मचारी अतिशय प्रेमळ आणि योग्य सेवा देत असून एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर त्यांच्यामुळेच झाले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. चाळक, शाखेचे व्यवस्थापक व्ही.एल. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अभयशेठ बलई, पुरुषोत्तम उंदरे, कैलास अंबिलवादे, एडवोकेट नितीन अडसुरे, नारायण आठरे, बाळासाहेब आंबीलवादे, राहुलशेठ कत्तेवार, विठ्ठल जाधव, रितेश कराळे आधी सभासदांसोबत खातेदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.




