जलील राजे यांच्या वाढदिवसा निमित्त मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा शेवगाव येथे शालेय साहित्याचे वाटप,
जलील राजे यांच्या वाढदिवसा निमित्त मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा शेवगाव येथे शालेय साहित्याचे वाटप,
शेवगाव प्रतिनिधी – असिफ सय्यद
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सामजिक कार्यकर्ते श्री.
जलील राजे यांनी आपला वाढदिवस शेवगाव येथील मौलाना आझाद उर्दू शाळेत साध्या पद्धतीने साजरा केला, यावेळी जलील राजे यांनी अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला असे सांगितले,
त्यावेळी बोलताना श्री. जलील राजे यांनी सांगितले की, कुठलाही समाज हा शिक्षणा शिवाय प्रगती करू शकत नाही, अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजाला शिक्षणाकडे आकर्षित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले, वाढदिवसावर होणारा खर्च टाळून त्या खर्चात शाळेसाठी अभिनव असे वेगवेगळे उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजे जेणे करून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी हे शिक्षणाकडे आकर्षित होतील, आणि अल्पसंख्यांक समाज विकासाच्या प्रवाहात येईल हा हेतू समाजातील प्रत्येकाने नजरे समोर ठेवावा असा संदेशही यावेळी राजे यांनी दिला, यावेळी शाळेचे संस्थापक श्री. जमीर पठाण सर यांनी जलील राजे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे संस्थापक श्री. जमीर पठाण सरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना,,” समाजाची साथ ही शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी मोलाची ठरत असते आणि यातूनच आमची ही संस्था प्रगती पथावर असल्याचं प्रतिपादन यावेळी बोलताना श्री जमीर सर यांनी केले.
शेवगाव नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री.वजीर पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी ज्येष्ठ नागरिक फकीरमहम्मद शेख, युसुफ पटेल, राजू जहागीरदार, इन्सानियत फाऊंडेशन चे इस्माईल शेख, सेतू केंद्र समन्वयक आसिफ सय्यद, मोसिम पटेल, युसुफ शेख, पत्रकार युनूस शेख, जावेद शेख, रईस राजे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.मुर्तुजाभाई शेख यांनी केले.