Breaking
महाराष्ट्रराजकिय

वर्षानुवर्षी सत्ता भोगून यांनी कुठला विकास केला ? – हर्षदा काकडे

0 6 0 5 4 7

वर्षानुवर्षी सत्ता भोगून यांनी कुठला विकास केला?- हर्षदा काकडे
शेवगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

प्रस्थापित साखर सम्राटांनी शेतकरी हिताची एखादी चळवळ केलेली तुम्ही कधी पाहिली का ? मात्र सत्ता आपल्यालाच व आपल्या ठराविक बगलबच्चांनाच मिळाली पाहिजे म्हणून ग्रा.पं. निवडणुकीत देखील हे प्रस्थापित नेते सक्रिय होतात. सत्तेचे सर्व केंद्र यांच्याच ताब्यात यांना लागतात. दोन्ही तालुक्यात प्यायला पाणी नाही, तर काही गावात जायला रस्ते नाहीत. वर्षानुवर्षी सत्ता भोगून मग यांनी कुठला विकास केला ? त्यामुळे आता जनता हुशार झाली असून या विधानसभेत गोरगरीब जनता यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केले.
आज दि(१३) रोजी शेवगाव येथे जनशक्तीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पंडितराव नेमाने हे होते. तर कार्यक्रमासाठी जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, रामराव गीते, नानासाहेब जाधव, संजय चेके, गणेश वायकर, सुरेश कुटे, सचिन कोलते, विनायक देशमुख, ह.भ.प. नारायण महाराज गर्जे, शंकर भोईटे, अशोक शेळके, सुदाम पवार, प्रशांत चव्हाण, धनंजय घोडके, महेश दौंड, विनायक चौधरी, विशाल शेटे, मंगेश राठोड, भगवान डावरे, देविदास गिर्हे, देवराव दारकुंडे, राजेंद्र पोटफोडे, आबासाहेब काकडे, दीपक मगर, अशोकराव पातकळ, रावसाहेब ढाकणे, मिठू बोडखे, रामदास विखे, आबासाहेब बेडके, निवृत्ती चव्हाण, अशोक शिरसाठ, सचिन आधाट, छबू मुंडलिक, रोहिदास पातकळ, मच्छिंद्र टेकाळे, विष्णू दिवटे, भिवसेन केदार, बाळू पाटेकर, राधाकिसन शिंदे, ज्ञानेश्वर नागरे आदी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलतांना सौ.काकडे म्हणाल्या की, १० वर्षापासून हे बिळात जाऊन बसले होते व आता विधानसभा आली म्हणून हे बाहेर निघाले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी या दोन्ही तालुक्याच्या जनतेच्या मनातून उतरल्या आहेत. कुठेही विकास झालेला दिसत नाही. फक्त यांचा स्वतःचा विकास झालाय. या साखर सम्राटांची एकच जात आहे ती म्हणजे काही करून सत्ता मिळवायची. यांचे पक्ष पाच मिनिटात बदलतात यांची कोणत्याही नेत्यावर निष्ठा नाही. फक्त सौदाबाजी करत तिकीट आणायचे. खऱ्या काम करणाऱ्याला पक्षात न्याय नाही. हे आमचे तिकीट चोरून नेले तेव्हा समजले म्हणून मी कोणत्याही पक्षाच्या दारात न जाता गोरगरीब जनतेच्या दारात हजार वेळा जाईल व जात आहे. जनतेचे तिकीट महत्वाचे मानते. प्रस्थापितांचे विरोधात एक लाट तयार झाली आहे. व ती लाटच मला विजयी करणार आहे असेही सौ.काकडे बोलताना म्हणाल्या.
अॅड.शिवाजीराव काकडे म्हणाले की, भाजप तळागाळात वाढवण्याचे काम मी केले व अचानकपणे माझे तिकिटाचा सौदा झाला. मला डावलून काँग्रेस मधून येऊन राजळेंनी तिकीट चोरले. तेव्हापासून माझा पक्षावरचा विश्वास उडाला आहे. म्हणून ही निवडणूक सर्वसामान्यांच्या जोरावर लढणार आहोत. तुम्ही कामाला लागा. तसेच दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी ‘नाम फाउंडेशन’चे श्री मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खंडोबा मैदान येथे निर्धार मेळावा आपण आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा असे आवाहनही यावेळी ॲड काकडे यांनी केले.
यावेळी पंडितराव नेमाने, जगन्नाथ गावडे, अर्जुन खंडागळे, विनायक काटे, नारायण गर्जे, राजेंद्र उगलमुगले, भागचंद कुंडकर, विनायक देशमुख आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी तर वैभव पुरणाळे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे