गोगलगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
गोगलगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी काही दिवसापूर्वी सर्व भाविकांना अवाहन केले होते कि, देवगड येथे भाविकांनी वस्त्रदान,हार, पुष्पगुच्छ यावर होणारा खर्च टाळून आपल्या गावातील शालेय विद्यार्थ्यांना वही, पुस्तक, पेन शालेय साहित्य वाटप करा. या संकल्पनेची सुरुवात आज गोगलगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केली. इयत्ता पहिली ते चौथीतील शंभर विद्यार्थ्यांना पेन, वही, खाऊ व अंगणवाडीतील शंभर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. गोगलगावचे माझी उपसरपंच विजय उमाप यांनी ही संकल्पना आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडली. यासाठी दत्तात्रय उमाप, अनिल उत्तम उमाप, संदीप गाढे, अमोल जगताप, निलेश उमाप, ग्रामसेवक अविनाश म्हस्के, यांनी मदत केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चिरंजीव उमाप, विश्वास मते, पवार सर, मुख्याध्यापिका कोथिंबीर मॅडम, यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आबासाहेब मते, राजेंद्र डांगे कडूबाळ ठोसरे, सागर आगळे, सुनील बेहळे,पोपट दळे, प्रदीप उमाप,अनिल उमाप,वसंत आगळे,प्रमिला उमाप, कडूबाई आगळे, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. नंदू सर यांनी आभार व्यक्त केले.