Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बेलापूर -परळी रेल्वे मार्गाला मंजुरी द्या -खासदार वाकचौरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी.

0 4 0 5 2 5

 

बेलापूर -परळी रेल्वे मार्गाला मंजुरी द्या -खासदार वाकचौरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी.

नेवासा प्रतिनिधी – (मंगेश निकम )

102 वर्षे प्रलंबित श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात ब्रिटिश काळात मंजुरी मिळून या रेल्वे मार्गाची भूमि अधिग्रहण करून माती भरावाचे काम झालेले आहे परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग दुर्लक्षित राहिला 2009 पासून मी या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करीत आहे या रेल्वे मार्गामुळे नगर व बीड हे जिल्ह्यातील सहा ते सात तालुक्यांचा विकास खुंटलेला आहे तसेच हा रेल्वे मार्ग झाल्यास शिर्डी ते तिरुपती बालाजी या दोन जागतिक तीर्थक्षेत्रातील अंतर 550 किलोमीटर ने कमी होऊन जागतिक तीर्थक्षेत्र जोडले जाऊन यातून भाविकांची सोय होणार आहे तसेच या रेल्वे मार्गावर दहा ते बारा साखर कारखाने जिनिंग प्रेसिंग दूध डेअरी फळे भाजीपाला इत्यादीचे उत्पादन करणारा भाग असल्यामुळे रेल्वेला देखील मालवाहतुकीतून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे या रेल्वे मार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50% महाराष्ट्र शासनाचे सहभागाचे पत्र रेल्वे बोर्डाकडे दिलेले आहे वरील रेल्वे मार्गाची सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आलेला आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून हा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे या मार्गाला मंजुरी देऊन या रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार वाकचौरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाची चेअरमन यांना देण्यात आले आहे.

*प्रतिक्रिया*
* बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांचे नेतृत्वाखाली आमचा लढा सुरू आहे माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत राज्य शासनाचे 50% सहभागाचे पत्र मी मंजूर करून घेतलेले आहे केंद्रीय मंजुरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे
बाळासाहेब मुरकुटे
माजी आमदार नेवासा
………………………………………………………

* श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी आमरण उपोषण आत्मदहन असे आंदोलने केलेले आहेत स्वर्गीय खासदार दिलीप गांधी खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या सर्वांचा या कामात सिंहाचा वाटा आहे दहा वर्षे सत्ताधारी पक्षाचे खासदार असूनही या रेल्वे मार्गासाठी काहीच प्रयत्न करण्यात आले नाही याचे वाईट वाटते.
रितेश भंडारी
सचिव बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था.
……………………………………………………….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे