Breaking
ई-पेपर

कार्तिक पौर्णिमेनिमित्त देवगड येथे भाविकांची गर्दी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

0 6 0 5 4 7

कार्तिक पौर्णिमेनिमित्त देवगड येथे भाविकांची गर्दी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

व्हाईस-नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेपासून दुपारपर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा व कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
कार्तिक पौर्णिमेला दुपारी १२ वाजता श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयासह  कार्तिक स्वामींचा जयघोष व घंटानाद करत महाआरती करण्यात आली. कार्तिक स्वामींच्या उपासनेने साहस धाडस शक्ती युक्ती व बुद्धीची प्राप्ती होते ती सर्वांना प्राप्त होवो, देशवासियांमध्ये एकोपा निर्माण होऊन बलशाही भारत निर्माण होवो त्यासाठी राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांनी यावेळी बोलतांना केली.
कार्तिक पौर्णिमेला भाविकांनी दर्शनासाठी गर्दीचा उच्चांक केला होता यात महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती.कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला,दुपारच्या महाआरती प्रसंगी भाविकांनी हातात मोरपीस हलवून भगवान दत्तात्रय, कार्तिक स्वामी व श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांचा नामघोष केला.
यावेळी झालेल्या धार्मीक कार्यक्रमाचे पौरोहित्य प्रवरासंगम येथील कांतागुरू जोशी यांनी केले.झालेल्या महाआरती प्रसंगी पंचगंगा उद्योग समूहाचे उद्योजक प्रभाकरराव शिंदे,पोलीस निरीक्षक महेश पाटील,गणपत महाराज आहेर,बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे  गायक रामजी विधाते,बजरंग विधाते यांच्यासह भक्त परिवारातील संत सेवेकरी, महाराज मंडळी गायक वादक सेवेकरी यांच्यासह संभाजीनगर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराच्या प्रांगणात विविध स्टॉल लावण्यात आल्याने कार्तिक पौर्णिमा उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

देवगडचे  प्रांगण गर्दीने फुलून गेले होते.भगवान दत्तात्रयांच्यासह कार्तिक स्वामी व श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा यांच्या समाधी दर्शन मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी भाविकांची बारी लागली होती उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे