भेंडा बु येथे विविध ठिकाणी देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा..
भेंडा बु येथे विविध ठिकाणी देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा
भेंडा ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील भेंडा बु ॥ येथे विविध ठिकाणी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी
गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
भेंडा बु ” गावठाण जि प शाळेत ह.भ.प. मिराबाई महाराज मिरीकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी भेंडा गावच्या सरपंच सौ . रोहिणी नामदेव निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या . जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये । प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष – माजी आ पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक ॲड देसाई देशमुख ,काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक – अनिल शेवाळे , कामगार संचालक – सुखदेव फुलारी तसेच विश्वस्त
शिवाजीराव कोलते यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले, तसेच जिजामाता हायस्कूल व जिजामाता महाविद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . भेंडा फॅक्टरी जि प शाळेत मारू तरावजी घुले पाटिल पतसंस्थेचे अध्यक्ष – बबनराव धस यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी व्यासपिठावर भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष – नामदेवराव निकम, गणेशराव गव्हाणे, ज्ञानेश्वर कारखान्याचे सचिव – रविंद्र मोटे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर भेंडा बु ” ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण शिवाजी फुलारी व संतोष साळवे यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी ग्राम विस्तार अधिकारी – रेवन्नाथ भिसे उपस्थित होते . तसेच भेंडा येथील फुलारी (वस्ती ) जि प प्राथमिक शाळेत जेष्ठ उद्योजक – माधवराव काळे व ग्रामपंचायत सदस्या सौ संगिता नामदेव शिंदे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी – बलभिम फुलारी होते उपसरपंच – पंढरीनाथ फुलारी – भाजपाचे नेवासा तालुका अध्यक्ष – भाऊसाहेब फुलारी, डॉ संतोष फुलारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
जि प प्राथमीक शाळा ( फुलारी वस्ती ) भेंडा बु ॥ या शाळेचे १ ली ते ५ वी ची पटसंख्या १२५ असून स्कॉलरशीप तसेच नवोदय परिक्षा सन २0२१ – २२ या वर्षात कु सेजल सागर पंडीत व विराज अभय कोलते या दोन विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये निवड झाली आहे, मंथन प्रज्ञाशोध परिक्षा, भारत टॅलेंट सर्च परिक्षा अशा विविध स्पर्धा परिक्षेत या शाळेच्या विद्यार्थांनी यश संपादन केले आहे
भेंडा येथील उद्योजक – माधवराव काळे व ग्रामपंचायत सदस्या – संगिता शिंदे यांच्या वतीने १५० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमास बलभिम फुलारी, मराठी पत्रकार परिषदेचे नेवासा तालुका अध्यक्ष – नामदेव शिंदे,येडुभाऊ सोनावणे, अनिल गव्हाणे,उपसरपंच
पंढरीनाथ फुलारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष – भाऊसाहेब फुलारी , डॉ संतोष , सागर पंडीत, मुख्याध्यापक – रेखा फंड , शिक्षक – रविंद्र बांगर, संगिता नळे, लतिका पागिरे, स्मिता लवांडे , अंगणवाडी सेविका, मदतनिस आदिसह पालक उपस्थित होते .