वरखेड देवी यात्रेतील अवैध करणाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांचा अल्टिमेट आमदार लंघेंच्या अध्यक्षतेखाली वरखेड देवी यात्रा नियोजन बैठक संपन्न…..

वरखेड देवी यात्रेतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांचा अल्टिमेट आमदार लंघेंच्या अध्यक्षतेखाली वरखेड देवी यात्रा नियोजन बैठक संपन्न…..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्यामध्ये नवलौकिक असलेल्या महालक्ष्मी वरखेड देवी यात्रेचे नियोजन बैठक आज नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आमदार लंघे बोलताना म्हणाले की या यात्रा उत्सवाचे नियोजन हे सुसज्ज पद्धतीने व्हावे तसेच मी दरवर्षी यात्रा उत्सवाच्या नियोजन बैठकीच्या दरम्यान उपस्थित असतो परंतु यावेळेस मी आमदार म्हणून या नियोजन बैठकीला आलो असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना सांगितले. माझ्या आमदार पदासाठी लक्ष्मी मातेचा व आपला वरखेड ग्रामस्थांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी डी.वाय.एसपी संतोष खाडे यांनी सांगितले की यात्रा उत्सवाच्या काळामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे की अवैद्य धंदे करण्याची गई केली जाणार नाही तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या वरती कठोर कारवाई करून त्यांना योग्य ती शासन दिले जाईल तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुकी व्यवस्था योग्य ते नियोजन केले जाईल असे त्यांनी बोलताना सांगितले.
वरखेड देवी यात्रा उत्सवाची नियोजन बैठक आ. विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न यावेळी नेवासा तालुक्याचे तहसीलदार संजय बिराजदार, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी संजय खाडे, सरपंच विनोद ढोकणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर डींबर, सर्वजनिक बांधकाम विभागाचे दुबाले साहेब, सर्कल पुंड मॅडम, एस टी महामंडळाचे अधिकारी वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर मुरदारे ,विद्युत महामंडळाचे अधिकारी राहुल बडवे कडुबाळ गोरे
या बैठकीदरम्यान उपस्थित होते उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान यात्रा काळा मधील विविध विषयावरती तसेच उपाय योजना नियोजन चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली तसेच आमदार लंघे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रा शांततेत पार पाडण्यासाठीच्या सूचना दिल्या तसेच गावकऱ्यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलीस उपविभागीय पोलीस निरीक्षक
संतोष खाडे यांनी सुरक्षेच्या विषयी आपल्या खात्याच्या वतीने माहिती दिली, तसेच तहसीलदार संजय बिराजदार यांनीही प्रशासनाच्या वतीने नियोजन कसे असेल याची माहिती दिली, तसेच विद्युत विभागाचे व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या दरम्यान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते.